IND vs ENG 5th Test India Playing XI : अँडरसन-तेंडुलकर स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध भारत आणि यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगला आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलनं नाणेफेक गमावली. इंग्लंडचा नवा कर्णधार ओली पोप याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
करुण नायरला आणखी एक संधी
इंग्लंडच्या संघाने एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले होते. भारतीय संघही पाचव्या सामन्यात पाच बदलासह मैदानात उतरला आहे. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे करुण नायरला आणखी एक संधी मिळाली आहे. पहिल्या तीन सामन्यातील अपयशानंतर चौथ्या सामन्यात त्याच्यावर बाकवर बसण्याची वेळ आली होती. पाचव्या सामन्यात तो मध्यफळीत खेळताना दिसेल.
पंतच्या जागी ध्रुव जुरेल! गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णासह आकाशदीपचं कमबॅक
दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या रिषभ पंतच्या जागी अपेक्षेप्रमाणे ध्रुव जुरेल याला संधी मिळाली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून प्रसिद्ध कृष्णासह आकाश दीप यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली आहे.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेट किपर बॅटर), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.