Join us

आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)

ड्रेसिंग रुममधून गिल-जड्डूचा इशारा; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:57 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 3 लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील  इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात आकाशदीपनं अविस्मरणीय खेळीचा नजराणा पेश केला. दुसऱ्या दिवसाअखेर नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाश दीपनं कसोटी कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 आकाशदीपकडे अर्धशतकीचा आनंद शतकी तोऱ्यात साजरा करण्याची डिमांड

फलंदाजांसाठी मुश्किल असलेल्या खेळपट्टीवर आकाशदीपनं संयम अन् तंत्रशुद्ध फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केल्यावर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील माहोल बघण्याजोगा होता. संघातील खेळाडूंनी त्याच्या या कडक अर्धशतकी खेळीला स्टँडिग ओव्हेशन दिलीच. पण कर्णधार शुबमन गिल अन् रवींद्र जडेजाने तर थेट आकाशदीपकडे अर्धशतकी खेळीचा आनंद शतकी खेळीच्या तोऱ्यात साजरा करण्याचा इशाराही केला. ड्रेसिंग रुममधील हा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'

ड्रेसिंग रुममधून गिल-जड्डूचा इशारा

आकाशदीपनं अर्धशतक साजरे केल्यावर ड्रेसिंग रुममध्ये टीम इंडियातील खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात त्याच्या खेळीला दाद दिली. शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा ओव्हलच्या ड्रेसिंग रुममधील बाल्कनीतून आकाशदीपला हेल्मेट काढून अर्धशतकाचा आनंद साजरा कर, असा इशारा करताना दिसले. 

अविस्मरणीय अर्धशतक अन् यशस्वीच्या साथीनं शतकी भागीदारी

 ओव्हल कसोटीतील  दुसऱ्या दिवसाच्या खेळात दुसऱ्या डावात टीम इंडियाची अवस्था  २ बाद ७० धावा असताना आकाशदीप फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला उत्तम साथ देत त्याने १२ चौकाराच्या मदतीने ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जेमी ओव्हरटन याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.  आउट होण्याआधी यशस्वी जैस्वालसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडआकाश दीपशुभमन गिलरवींद्र जडेजा