IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...

टीम इंडियाकडून फलंदाजीत करुण नायरची फिफ्टी. दुसऱ्या बाजूला गस ॲटकिन्सन याने मारला 'पंजा'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:42 IST2025-08-01T16:31:43+5:302025-08-01T16:42:12+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Day 2 Karun Nair Fifty India 224 All Out Gus Atkinson 5 Wickets Haul | IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...

IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 5th Test India 224 All Out In 1st Innings : लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला आहे. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ६ बाद २०४ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. पण खेळाला सुरुवात झाल्यावर जॉश टंग याने करुण नायरच्या खेळाली ५७ धावांवर ब्रेक लावला. त्यानंतर गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याने उर्वरित ३ विकेट्स घेत टीम इंडियाचा पहिला डाव तासभराच्या  आतच आटोपला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने अवघ्या २० धावांत ४ विकेट्स गमावल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

करुण नायरचं अर्धशतक

भारतीय संघाकडून करुण नायरनं  अर्धशतकी खेळीसह सर्वाधिक धावा केल्या. त्याने १०९ चेंडूचा सामना करताना ५७ धावांची खेळी केली. यात ८ चौकारांचा समावेश होता. साई सुदर्शन याने १०८ चेंडूचा सामना करताना ३८ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय वॉशिंग्टन सुंदर २६ (५५), ध्रुव जुरेल १९ (४०), शुबमन गिल २१ (३५) धावांची खेळी केली.

IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?

गस ॲटकिन्सनचा 'पंजा'  

इंग्लंडच्या ताफ्यातून गस ॲटकिन्सन याने दमदार कमबॅक करताना वॉशिंग्टनसह तळाच्या फलंदाजीतील तिघांना आउट करत पाच विकेट्सचा डाव साधला. त्याच्याशिवाय जॉश टंगन ३ तर क्रिस वोक्सनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. ओव्हलची खेळपट्टी जलगती गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. इंग्लंडप्रमाणेच भारतीय गोलंदाज या मैदानात गोलंदाजीत धमक दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title: IND vs ENG 5th Test Day 2 Karun Nair Fifty India 224 All Out Gus Atkinson 5 Wickets Haul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.