IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?

ECB क्रिकेट बोर्डानं एक्स अकाउंटवरून तो फायनल कसोटी सामन्यातून आउट झाल्याची माहिती दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:42 IST2025-08-01T15:35:49+5:302025-08-01T15:42:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Chris Woakes Out Of Final Test Following Shoulder Injury At Kennington Oval London | IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?

IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Chris Woakes Out Of Final Test Following Shoulder Injury : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात क्रिस वोक्सला दुखापत झाली होती. त्याने चौकार वाचवला, पण एक धाव वाचवण्याचा हा प्रयत्न जलदगती गोलंदाजासह इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का देणारा ठरलाय. कारण हा गोलंदाज आता उर्वरित सामन्यात खेळणार नाही. ECB क्रिकेट बोर्डानं एक्स अकाउंटवरून तो फायनल कसोटी सामन्यातून आउट झाल्याची माहिती दिली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्रिस वोक्सच्या खांद्याला दुखापत

द ओव्हलच्या मैदानात करुण नायरनं मारलेला चेंडू अडवताना क्रिस वोक्सनं सीमारेषेवर धडपडला. खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो उर्वरित सामन्यात खेळताना दिसणार नाही. इंग्लंडच्या संघाला बसलेला हा धक्का टीम इंडियाच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. कारण क्रिस वोक्स हा गोलंदाजीत सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाज आहे. एवढेच नाही तर फलंदाजीतही तो उपयुक्त योगदान देऊन शकतो. पण आता इंग्लंडच्या संघाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागेल.

Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)


फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल; पण ९ विकेट्स पडल्या की, इंग्लंडचा खेळ होईल खल्लास

आयसीसीच्या नियमानुसार, दुखापतग्रस्त क्रिस वोक्सच्या जागी फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मैदानात उतरेल. पण त्याच्या जागी फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला गोलंदाजी आणि फलंदाजी करता येणार नाही. फलंदाजीत दोन्ही डावात इंग्लंडच्या संघाला १० गड्यांसह खेळावे लागेल. याचा अर्थ ९ विकेट्स पडल्या की, इंग्लंडचा डाव खल्लास होईल. टीम इंडिया याचा फायदा उठवत मालिकेत बरोबरी साधण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

 

Web Title: IND vs ENG 5th Test Chris Woakes Out Of Final Test Following Shoulder Injury At Kennington Oval London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.