Join us  

IND vs ENG 5th T20, Shardul Thakur : शार्दूल ठाकूरनं कलाटणी दिली अन् टीम इंडियानं मालिका खिशात घातली 

Team India win the match by 36-run win १ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ५ बाद १४२ असा गडगडला. त्यानंतर टीम इंडियानं हा सामना सहज जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:54 PM

Open in App
ठळक मुद्दे३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला१ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ८ बाद १८८ असा गडगडला.

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माविराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. रोहित व विराट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या यांनीही हात धुवून घेतले. भारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) मॅजिकल ओव्हर टाकली आणि टीम इंडियानं सामन्याला कलाटणी दिली. इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली.  विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम

पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. रोहित माघारी परतल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) षटकारानं डावाची सुरुवात केली.  विराट व सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. पण, १४ व्या षटकात या भागीदारीला ब्रेक लागला. सूर्यकुमारनं १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या. विराटनं ट्वेंटी-२०तील २८वे अर्धशतक ३७ चेंडूंत पूर्ण केलं. हार्दिक पांड्या १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३९ धावांवर नाबाद राहिला. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match

दुसऱ्याच चेंडूवर विकेट, तरीही इंग्लंडची गाडी सुसाट...लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं धक्का दिला.  भुवीनं सलामीवीर जेसन रॉयचा त्रिफळा उडवला. पण, जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तिसऱ्या ट्वेंटी-२०त बटलरनं नाबाद ८३ धावा करताना भारताला पराभूत केलं होतं. मालिकेत आतापर्यंत फार चांगली कामगिरी करू न शकलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज मलाननं दमदार खेळ केला. १३व्या षटकात ही भागीदारी तुटली. या दोघांनी ८२ चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली. भुवीनं जोस बटलरला ( ५२) बाद केले. Ind vs Eng Live Score Today, Ind vs Eng 5th T20 Live Update What a Catch!; ख्रिस जॉर्डनच्या अविश्वसनीय कॅचनं सर्वांना वेड लावलं; सूर्यकुमार यादवला Out केलं, Video

डेवीड मलानला वर्ल्ड रेकॉर्ड अन् शार्दूल ठाकूरचे धक्केट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम डेवीड मलाननं नावावर केला. त्यानं २४ डावांत हा पराक्रम करताना बाबर आझम ( २६ डाव) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. ( Dawid Malan becomes the quickest batsman to complete 1000 T20I run) १५व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं जॉनी बेअरस्टो ( ७) व मलान य़ांना बाद केले. मलान ४६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. १ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ५ बाद १४२ असा गडगडला. त्यानंतर टीम इंडियानं हा सामना सहज जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशार्दुल ठाकूरभुवनेश्वर कुमारविराट कोहलीरोहित शर्माहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव