IND vs ENG, 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम

Virat Kohli Records in 5th T20I विराट कोहलीनं आज मोठ मोठे विक्रम मोडले. त्यानं सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) नावावर असलेला विक्रम मोडलाच शिवाय आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेले पराक्रमही केले

IND vs ENG, 5th T20, Virat Kohli : भारतीय फलंदाजांनी पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यांत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हात साफ केले. रोहित शर्मा ( Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी तुफान फटकेबाजी केली. भारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपल्या. इंग्लंडविरुद्धची टीम इंडियाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. सूर्यकुमार १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३९ धावांवर नाबाद राहिला. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.

या मालिकेत विराटनं दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या सामन्यात सलामीला येत अर्धशतक झळकावलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील त्याचे हे २८ वे अर्धशतक ठरलं.

या सामन्यात ८० धावा चोपणाऱ्या विराट कोहलीनं आज मोठ मोठे विक्रम मोडले. त्यानं सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) नावावर असलेला विक्रम मोडलाच शिवाय आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेले पराक्रमही केले.

विराट कोहलीनं आशियात ( Most runs in Asia) १३००० धावांचा पल्ला याच सामन्यात पार केला. असा पराक्रम करणारा तो सहावा फलंदाज ठरला. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( २१७४१), कुमार संगकारा ( १८४२३), माहेला जयवर्धने ( १७३८६), सनथ जयसूर्या ( १३७५७) आणि राहुल द्रविड ( १३४९७) हे आघाडीवर आहेत.

आशियात १३००० धावा करणारा विराट सहावा फलंदाज असला तरी त्यानं हा पल्ला सर्वात जलद गाठला. Fastest to reach 13000 runs in Asia. विराटनं २६० डावांत हे शिखर सर केलं. सचिन तेंडुलकरला २७७ डाव खेळावे लागले होते. कुमार संगकारा ( २९४ डाव), माहेला जयवर्धने ( ३१६), राहुल द्रविड ( ३२७) व सनथ जयसूर्या ( ३७१) हे त्यामागोमाग येतात.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधाराचा ( Most T20I runs as a captain) विक्रमही विराटनं नावावर केला. त्यानं १४६३* धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच ( १४६२), केन विलियम्सन ( १३८३), इयॉन मॉर्गन ( १३२१) यांना त्यानं मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून सर्वाधिक १२ अर्धशतकांचा विक्रमही विराटनं नावावर केला. (Most 50 plus scores as captain in T20Is) त्यानं केन विलियम्सनचा ११ अर्धशतकांचा विक्रम मोडला. अॅरोन फिंच ( १०), इयॉन मॉर्गन ( ९) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( ८) यांचा क्रमांत त्यानंतर येतो.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक १८वेळा २००+ धावा करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया ( १४), दक्षिण आफ्रिका ( १३), न्यूझीलंड (११), इंग्लंड ( १० ) व वेस्ट इंडिज ( ८) यांचा क्रमांक येतो.

द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला. त्यानं या मालिकेत २३१ धावा केल्या आहेत. ( Most runs by a captain in a bilateral T20I series). त्यानंतर अॅरोन फिंच ( १९७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, २०२१) आणि इयॉन मॉर्गन ( १९२ धावा वि. न्यूधीलंड, २०१९) यांचा क्रमांक येतो.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० द्विदेशीय मालिकेत ( किमान ५ सामने) सर्वाधिक २३१ धावांचा विक्रम विराटनं केला. त्यानं लोकेश राहुलचा २२४ ( वि. न्यूझीलंड, २०२०) आणि कॉलीन मुन्रो २२३ ( वि. वेस्ट इंडिज, २०१७) यांचा विक्रम मोडला.