IND vs ENG 5th T20 : टीम इंडियाच्या फलंदाजांना आली लहर, इंग्लंडच्या गोलंदाजांवर केला कहर; उभारला धावांचा डोंगर!

IND vs ENG 5th T20 : India record their highest T20I score against England, India - 224/2; Virat Kohli 80*(52) & Rohit Sharma 65(34)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:47 PM2021-03-20T20:47:06+5:302021-03-20T20:47:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th T20 : India record their highest T20I score against England, India - 224/2; Virat Kohli 80*(52) & Rohit Sharma 65(34) | IND vs ENG 5th T20 : टीम इंडियाच्या फलंदाजांना आली लहर, इंग्लंडच्या गोलंदाजांवर केला कहर; उभारला धावांचा डोंगर!

IND vs ENG 5th T20 : टीम इंडियाच्या फलंदाजांना आली लहर, इंग्लंडच्या गोलंदाजांवर केला कहर; उभारला धावांचा डोंगर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्याविराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माविराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. या मालिकेत आतापर्यंत भारतीय सलामीवीरांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यात विराटनं सातत्यानं प्रयोग केलं अन् अखेरीस आजचा त्याचा प्रयोग यशस्वी ठरला. रोहित ( Rohit Sharma) व विराट ( Virat Kohli) यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. रोहित व विराट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) इंग्लंडच्या गोलंदाजांवर पुन्हा फटकेबाजी करताना दिसला. भारतीय फलंदाज आज इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याच्या निर्धारानंच मैदानावर उतरले होते आणि त्यांनी २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून ते दाखवून दिले. 


पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्वेंटी-20त एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( १०) अव्वल स्थान पटकावले. ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो यांनी प्रत्येकी ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या.   Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score  


रोहित माघारी परतल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) षटकारानं डावाची सुरुवात केली. चौथ्या कसोटीतही त्यानं पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. सूर्यकुमार व विराट यांनी आक्रमक खेळ सुरूच ठेवताना इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे उपटली.  विराट व सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. पण, १४ व्या षटकात या भागीदारीला ब्रेक लागला. आदिल राशिदच्या चेंडूवर सूर्यकुमारनं जोरदार फटका मारला, हा षटकार अशी खात्रीच सर्वांना होती, परंतु ख्रिस जॉर्डनं वाऱ्याच्या वेगानं धावला अन् एका हातानं झेल टिपला. सीमारेषा पार करण्यापूर्वी त्यानं चेंडू जेसन रॉयकडे फेकला अन् सूर्यकुमारला माघारी जावं लागलं. त्यानं १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match


विराटनं ट्वेंटी-२०तील २८वे अर्धशतक ३७ चेंडूंत पूर्ण केलं. हार्दिक पांड्या १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३९ धावांवर नाबाद राहिला. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IND vs ENG 5th T20 : India record their highest T20I score against England, India - 224/2; Virat Kohli 80*(52) & Rohit Sharma 65(34)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.