Join us

IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)

गिलच्या विकेटसह टीम इंडियाने रिव्ह्यूही गमावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:08 IST

Open in App

Ben Stokes removes Shubman Gill : मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल जोडनं पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. लंचपर्यंत टीम इंडिया भक्कम स्थितीत होती. पण लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वालनं ठराविक अंतराने विकेट गमावली अन् डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार शुबमन गिलवर येऊन पडली. साई सुदर्शनसोबत तो सेटही झाला. पण बेन स्टोक्सनं टाकलेल्या चेंडूवर त्याचा अंदाज चुकला अन् पायचित होऊन १२ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. चहापानाच्या ब्रेकआधी धावफलकावर १४० धावा असताना गिलच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. नेमकं काय घडलं? तो बेन स्टोक्सच्या जाळ्यात कसा फसला जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गिलच्या विकेटसह टीम इंडियाने रिव्ह्यूही गमावला 

शुबमन गिलची विकेट पाहिल्यावर अनेक क्रिकेट चाहत्यांना चौथ्या कसोटी सामन्यात बाकावर बसवलेल्या करुण नायरची आठवण झाली असेल. लॉर्ड्सच्या मैदानात करुण नायर याने चेंडू सोडला अन् तो पायचित झाला होता. पण शुबमन गिल त्यापेक्षा वाईटरित्या आउट झाला. भारताच्या पहिल्या डावातील ५० व्या षटकात बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर आउटसाइड ऑफ लेंथवरील चेंडू शुबमन गिलनं सोडला अन् तो जाऊन पॅडवर आदळला. इंग्लंडच्या कर्णधाराने जोरदार अपील केल्यावर आवश्यक वेळ घेत मैदानातील पंचांनी बोट वर केले. आपली विकेट वाचवण्यासाठी मग शुबमन गिलनं रिव्ह्यू घेतला. पण कॅप्टनच्या विकेटसह टीम इंडियाने हा रिव्ह्यूही गमावला. 

KL राहुलनं दाखवला क्लास! १००० धावांसह तेंडुलकर-द्रविडसह गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री

चेंडू न खेळल्यामुळे पंचांनी गिलला दिलं आउट, कारण...

शुबमन गिलनं DRS घेतल्यावर चेंडू आउटसाउड ऑफ पिचिंग (ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा) होता ते स्पष्ट झाले. पण चेंडू स्टंपवर हिट होत होता.  MCA च्या नियमानुसार, या परिस्थितीत फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला नाबाद ठरवण्यात येते. याउलट फलंदाजाने चेंडू खेळला नाही तर मात्र  तो आउट ठरतो. गिलनं चेंडू न खेळल्यामुळे पंचांनी त्याला बाद घोषित केले. जर त्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरी केला असता तर तो नॉटआउट ठरला असता. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिल