भारत-इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेट जगतातील दोन दिग्गजांचा खास सन्मान करण्यात आला. इंग्लंडमधील या स्टेडियममध्ये भारताचे माजी विकेट किपर बॅटर फारूख इंजिनीयर (Farokh Engineer) आणि क्लाइव्ह लॉईड (Clive Lloyd) यांचे नाव देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या या दोन्ही दिग्गजांनी इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील लँकेशायर क्रिकेट क्लबसाठी जवळपास २० वर्षांहून अधिक योगदान दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरनंतर असा सन्मान लाभलेले दुसरे भारतीय ठरले फारूख इंजिनीयर
इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या स्टेडियममध्ये स्टँड उभारण्यात आलेले फारूख इंजिनीयर हे भारताचे पहिले क्रिकेटर ठरले आहेत. याशिवाय परदेशातील मैदानातील स्टँडला भारतीय क्रिकेटरचं नाव देण्याची ही दुसरी वेळ ठरलीये. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेडुंलकर याचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आला होता. २०२३ मध्ये युएईतील शारजहाच्या स्टेडियममधील स्टँडला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर आता इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये फारूख इंजिनीयर यांच्या नावाने स्टँड उभारण्यात आले आहे.
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा इंग्लंडच्या क्लबसाठी केल्यात सर्वाधिक धावा
१९६१ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या फारूख इंजिनीयर यांनी भारतीय संघाकडून ४६ कसोटी सामन्यातील ८७ डावात २६११ धावा केल्या आहेत. यात १६ अर्धशतकासह २ शतकांचा समावेश आहे. विकेटमागे त्यांनी ६६ झेलसह १६ फलंदाजांना यष्टिचित केल्याचा रेकॉर्ड आहे. ५ एकदिवसीय सामन्यातील ४ डावात त्यांच्या नावे ११४ धावांची नोंद आहे. लँकेशायर क्रिकेट क्लबकडून त्यांनी १७५ सामन्यात ५९४२ धावा केल्या आहेत. याशिवाय विकेटमागे ४२९ झेल आणि ३५ फलंदाजांना त्यांनी यष्टिचित केले आहे.
Web Title: IND vs ENG 4th Test Old Trafford Will Name A Stand After Farokh Engineer Second Indian Cricketer After Sachin Tendulkar To Receive Such An Honour Overseas Clive Lloyd Old Trafford
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.