भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंडच्या संघानं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जुन्या भिडूला संधी दिली आहे. लियाम डॉसन (Liam Dawson) भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून ८ वर्षांनी पुनरागमनासाठी सज्ज आहे. या अष्टपैलू खेळाडूनं २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने खेळलेली ही चाल टीम इंडियासारखीच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं
भारतीय संघानं इंग्लंड दौऱ्यावर अनुभवी करुण नायर याला कमबॅकची संधी दिली होती. त्यानंतर आता इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा हा पॅटर्न फॉलो करत दुखापतग्रस्त शोएब बशीरच्या जागी लायम डॉसन याला संधी दिलीये. पहिल्या ३ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा हा डाव फसल्यावर इंग्लंडनं घेतलेली रिस्क त्यांच्या अंगलट येणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. पण टीम इंडियापेक्षा ते निश्चितच सेफ आहेत. यामागचं कराण लायम डॉसन हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीशिवाय तो बॅटिंगमध्येही उपयुक्त खेळी करू शकतो. पण इंग्लंडच्या या निर्णयानंतर एकाच मालिकेत मोठ्या कालावधीनंतर दोन अनुभवी खेळाडूंचे कमबॅक होण्याची ही पहिली वेळ ठरलीये. करूण नायर आणि लियाम डॉसन दोघेही मोठ्या अंतरानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीच्या १० मध्ये आहेत.
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
सर्वाधिक काळानंतर कसोटीत कमबॅक करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावे?
कसोटी क्रिकेटमध्ये खूप दिवसांनी कमबॅक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जॉन ट्रायकोस सर्वात आघाडीवर आहेत. ५ मार्च १९७० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटरनं १८ ऑक्टोबर १९९२ मध्ये २२ वर्षे आणि २२२ दिवसांनी झिम्बाब्वेकडून कसोटीत कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तानचा युनिस अहमद १७ वर्षे १११ दिवस आणि इंग्लंडचा क्रिकेटर गॅरेथ बॅटी याने ११ वर्षे आणि १३७ दिवसांनी कसोटीत कमबॅक केल्याचा रेकॉर्ड आहे.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.