IND vs ENG, Washington Sundar And Ravindra Jadeja Fifty : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील चौथ्या सामन्यात केएल राहुल ९० (२३०) आणि शुबमन गिल १०२ (२३८) यांची विकेट गमावल्यावर टीम इंडिया पुन्हा अडचणीत सापडण्याची भिती निर्माण झाली होती. पण बढती मिळालेल्या वॉशिंग्टनच्या 'सुंदर' फिफ्टीसह जड्डूनंही मालिकेत आणखी एक अर्धशतक झळकावत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला आहे. भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाने मिळवलेली आघीडी भेदली असून डावानं पराभव होण्याचं मोठं संकट टाळलं आहे. आता या जोडीवर पराभव टाळण्याची मोठी जबाबदारी असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!पहिल्या सत्रात दोन विकेट्स, पण वॉशिंग्टन सुंदर अन् जड्डू जोडी जमली, अन्..
पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने पहिल्या सत्रात लोकेश राहुलच्या रुपात पहिली विकेट गमावली. बेन स्टोक्सनं त्याची विकेट घेतली. त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले. कर्णधार शुबमन गिल शतकी खेळीनंतर जोफ्रा आर्चरच्या जाळ्यात फसला. पण दुसऱ्या सत्रात वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा ही जोडी जमली. डावखुऱ्या जोडीनं शतकी भागीदारी रचत भारतीय संघावर डावानं पराभूत होण्याचं संकट टाळलं. दुसऱ्या सत्राअखेर दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावफलकावर ४ बाद ३२२ धावा करत संघाला ११ धावांची आघाडी मिळवून दिली होती.