Join us

VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...

आधी केएल राहुलला लो लेंथ चेंडू टाकत दिला चकवा, मग शुबमन गिलला मारला बाउन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 21:24 IST

Open in App

IND vs ENG Shubman Gill Suffers Ben Stokes Dangerous Bouncer :  मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या भारत इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या भात्यातून आणखी एक शतक पाहायला मिळाले.  शुबमन गिलनं २३८ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने १०३ धावांची उपयुक्त खेळी केली. जोफ्रा आर्चरनं त्याच्या त्याच्या शतकी खेळीला ब्रेक लावण्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स विरुद्ध शुबमन गिल यांच्यात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग पाहायला मिळाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी केएल राहुलला लो लेंथ चेंडू टाकत दिला चकवा, मग शुबमन गिलला मारला बाउन्सर

पायाच्या स्नायूसह खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त असलेल्या बेन स्टोक्सनं चौथ्या दिवसाच्या खेळात एकही षटक टाकले नव्हते. पण दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि लोकेश राहुल ही जोडी सेट झाल्यावर पाचव्या दिवशी अखेर त्याने चेंडू आपल्या हाती घेतला. लोकेश राहुलला लो लेंथ चेंडूवर फसवणाऱ्या स्टोक्सनं शुबमन गिलला उसळत्या चेंडूवर चकवा देण्याचा प्रयत्न केला.  

Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

बेन स्टोक्सचा बोटांना झिणझिण्या आणणारा चेंडू, बॅट फेकत हात झटकताना दिसला गिल, मग....

भारताच्या डावातील ७१ व्या आणि आपल्या वैयक्तिक चौथ्या षटकात बेन स्टोक्सनं लोकेश राहुलची विकेटे घेतली. आपल्या पाचव्या षटकातील (भारताच्या डावातील ७३ व्या षटकात) पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सनं भारतीय कर्णधाराला बाउन्सर मारला. टप्पा पडल्यावर वेगाने आलेला चेंडू खेळताना गिल चुकला आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर लागून हेल्मेटवर आदळला. चेंडूचा फटका बोटांवर जोरदार बसल्यावर शुबमन गिल हातातील बॅट फेकून देत ग्लोव्हज काढत हात झटकताना दिसून आले. बेन स्टोक्सचा झिणझिण्या आणरा चेंडू खेळला त्यावेळी गिल ९० धावांवर खेळत होता. मेडिकल ब्रेकनंतर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केले अन् शतकही पूर्ण केले. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्स