IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : मँचेस्टर कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा करत ३३११ धावांच्या आघाडी घेतली. सामना जिंकणं सोडा, पण पराभव टाळणं आव्हानात्क झाले असताना दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाने पहिल्याच षटकातील २ चेंडूवर २ विकेट्स गमावल्या. धावफलक न हलता दोन आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यालर लोकेश राहुल आणि शुबमन गिल जोडीनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिला आहे. या जोडीनं जवळपास साडे चार तास मैदानात तग धरत ३७३ चेंडूचा सामना करताना दोन्ही सत्राचा खेळ टीम इंडियाचे बाजूनं केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौथ्या दिवसाअखेर दोघेही अर्धशतकी खेळी करून नाबाद राहिल्यामुळे पराभवाचा धोका टाळत टीम इंडिया हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवे, असे चित्र निर्माण झाले आहे. खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या होत्या. भारतीय संघ अजूनही १३७ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे ही लढाई अजून संपलेली नाही. धोका पूर्णत: टाळण्यासाठी पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ही जोडी कशी करते? ते पाहण्याजोगे असेल.
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
दुसऱ्या डावाची खराब सुरुवात; टीम इंडियानं शून्यावर गमावल्या दोन विकेट्स
जो रुट १५० (२४८) पाठोपाठ इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या १४१ (१९८) शतकासह तळाच्या फलंदाजीत ब्रायडन कार्सनं केलेल्या ५४ चेंडूतील उपयुक्त अशा ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावानंतर ३११ धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील चौथ्याच चेंडूवर क्रिस वोक्सनं यशस्वी जैस्वाल याला खातेही न उघडता माघारी धाडले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनच्या पदरी गोल्डन डकची नामुष्की ओढावली. या दोन विकेट्समुळे इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशीच टीम इंडियाचा दुसरा डाव संपवत बाजी मारतोय की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण शुबमन गिल आणि लोकेश राहुलनं इंग्लंडला कडक रिप्लाय देत सामना सहजा सहजी सोडणार नाही हे दाखवून दिले.
अर्धशतकानंतर आता दोघांच्या शतकावर असतील नजरा
संघ अडचणीत असताना अनुभवी सलामीवीर लोकेश राहुल याने २०१० चेंडूंचा सामना करत ८ चौकाराच्या मदतीने ८७ धावांची आश्वासक खेळी केली. दुसऱ्या बाजूला तीन डावातील अपयशानंतर शुबमन गिल पुन्हा लयीत आला. त्याने १६७ चेंडूचा सामना करताना १० चौकाराच्या मदतीने नाबाद ७८ धावांची खेळी केली. ही जोडी शतकाच्या उंबरठ्यावर असून दोघेही हा डाव साध्य करत सामना जिंकता आला नाही तरी पराभव टाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.
Web Title: IND vs ENG 4th Test Day 4 Stumps KL Rahul Shubman Gill Lead Fight Back India trail by 137 Runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.