IND vs ENG 4th Test Day 4 First Time Jasprit Bumrah Conceded 100 Plus Runs : जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. ज्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे त्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली ती शैलीच त्याच्यासाठी धोकादायकही ठरताना दिसतीये. कारण मागील काही काळापासून तो सातत्याने पाठिच्या दुखापतीचा सामना करताना दिसून आले. परिणामी इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा गाजला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह मैदानात उतरला तो सामना टीम इंडियानं गमावला
पाच सामन्यांच्या मालिकेत तो फक्त तीन सामने खेळणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यातही तो ज्या सामन्यात खेळला त्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. एजबेस्टनच्या मैदानता तो बाकावर बसला तो सामना टीम इंडियाने जिंकला. आता चौथ्या आणि कदाचित या मालिकेत अखेरचा सामना असलेल्या मँचेस्ट कसोटी सामन्यात बुमराहवर नामुष्की ओढावली आहे.
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
७ वर्षांच्या कारकिर्दीत बुमराहवर पहिल्यांदाच आली ही वेळ
इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्ट कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेतल्या. जेमी स्मिथच्या रुपात पहिली विकेट खात्यात जमा करण्यासाठी जसप्रीत बुमराहला २४ षटके गोलंदाजी करावी लागली. याशिवाय लियाम डॉसनची विकेटही त्याने घेतली. पण इंग्लंडच्या पहिल्या डावात ३३ षटके गोलंदाजी करताना बुमराहनं ११२ धावा खर्च केल्या. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने शंभर पेक्षा अधिक धावा खर्च केल्या. याआधी २०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं एमसीजीच्या मैदानात २८.४ षटकात ९९ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या.
कारकिर्दीत दुसऱ्यांदा टाकली ३० षटके
जसप्रीत बुमराहनं इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ३० पेक्षा अधिक षटके टाकल्याचे पाहायला मिळाले. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ३३ षटके टाकण्याआधी २०२१ मध्ये बुमराहनं इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात ३६ षटके गोलंदाजी केली होती. यावेळीही त्याने फक्त २ विकेट्स घेतल्या होत्या.
Web Title: IND vs ENG 4th Test Day 4 First Time Jasprit Bumrah Conceded 100 Plus Runs In A Test Innings See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.