IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात २६४ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वालचे अर्धशतक ५८ (१०७) आणि लोकेश राहुलनं ९८ चेंडूत केलेल्या ४६ धावांच्या उपयुक्त खेळीनंतर साई सुदर्शनच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाला मोठा दिलासा, पण..
त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आहे. कारण ९ कसोटी सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंच्या प्रयोगानंतर तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाने अर्धशतक झळकावले आहे. एका बाजूला मोठा तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शनही वाढले आहे. एवढेच नाही तर सेट झालेला साई सुदर्शनही मोठी खेळी करण्यापासून चुकला.
केएल राहुल-यशस्वी जैस्वालची दमदार भागीदारी
सलग चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलनं नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची दमदार भागीदारी रचली. अर्धशतकापासून एक मोठा फटका दूर असताना क्रिस वोक्सनं केएल राहुलला ४६ धावांवर बाद केले. त्याची जागा साई सुदर्शन याने घेतली. तो सेटही झाला पण लियाम डॉसन (Liam Dawson) याने यशस्वी जैस्वाल याला आपल्या जाळ्यात अडकवले.
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
शुबमन गिल तिसऱ्या डावात ठरला अपयशी
इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या दोन सामन्यात दमदार फलंदाजी करणारा शुबमन गिल लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यानंतर पुन्हा एकदा अपय़शी ठरला. सलग तिसऱ्या डावात तो स्वस्तात बाद झाला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने चेंडू सोडला अन् पायचित होऊन त्याला तंबूत परतावे लागले. गिलनं २३ चेंडूत १२ धावा केल्या.
साई सुदर्शन-पंतची अर्धशतकी भागीदारी
शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघाने १४० धावांवर तिसरी विकेट गमावली. त्यानंतर साई सुदर्शन आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. ६८ व्या षटकात क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पंत दुखापतग्रस्त झाला. ४८ चेंडूत ३७ धावांवर खेळणाऱ्या पंतनं रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडले. साई सुदर्शन मोठा फटका मारण्याच्या नादात स्टोक्सच्या जाळ्यात अडकला. १५१ चेंडूत त्याने ६१ धावांची खेळी केली.
शार्दुल ठाकूर अन् जड्डू मैदानात
२३५ धावांवर साई सुदर्शच्या रुपात चौथी विकेट गमावल्यावर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर ही जोडी मैदानात खेळत होती. जड्डूनं ३७ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला शार्दुल ठाकूर ३६ चेंडूचा सामना करून १९ धावांवर खेळत होता.