Join us

IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा

jasprit bumrah injury update, ind vs eng 4th test: तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:37 IST

Open in App

 jasprit bumrah injury update, ind vs eng 4th test: इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहला फक्त एकच बळी घेता आला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल साशंकता दिसून आली. जेव्हा भारतीय कर्णधार शुभमन गिलने दुसरा नवीन चेंडू घेतला, तेव्हा बुमराहने फक्त एकच षटक टाकले आणि तो मैदानाबाहेर गेला. चांगली गोष्ट म्हणजे चहापानाच्या विश्रांतीआगोदर बुमराह मैदानात परतला. मैदानात परतल्यानंतरही जसप्रीत बुमराह लयीत दिसत नव्हता. त्याला डाव्या घोट्यात काही वेदना जाणवत होत्या. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली.

बुमराहच्या पायाच्या घोट्याला दुखापत- मोर्केल

तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीचा वेग फारच कमी दिसून आला. जसप्रीत बुमराह सहसा १३८-१४२ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करतो, परंतु त्याच्या गोलंदाजीच्या वेगात घट झाली. पदार्पणवीर अंशुल कंबोजही १२० किमी प्रति तासापेक्षा कमी वेगाने गोलंदाजी करताना दिसला. सिराजच्या गोलंदाजी नेहमीची धार दिसून आली नाही. भारतीय संघाचे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज दोघांनाही थोडीशी दुखापत झाली होती. त्यासंबंधी मोर्न मोर्केलने माहिती दिली. "जेव्हा आम्ही दुसरा नवीन चेंडू घेतला, तेव्हा पायऱ्या उतरताना बुमराहचा पाय मुरगळला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सिराजचा पायही फूटहोलमध्ये अडकून मुरगळला होता. पण आता दोघेही ठीक आहेत," असे बॉलिंग कोच मोर्ने मोर्केल यांनी सांगितले.

अपयशाची कबुली

"सपाट खेळपट्ट्यांवर संधी निर्माण करण्यासाठी गोलंदाजांना अधिक चेंडू उर्जेची आवश्यकता असते. आम्ही याचा विचार करत आहोत. अशा सपाट विकेटवर चेंडूमध्ये थोडी ऊर्जा आवश्यक असते, जेणेकरून झेल किंवा LBWची शक्यता असते. खेळाडूंचा कामाचा भार आणि हेवी आउटफिल्ड हे देखील गोलंदाजीचा वेग कमी होण्याचे कारण असू शकते. सिराजसारख्या खेळाडूंवर गोलंदाजीचा खूप जास्त भार आहे. अंशुलची ही पहिलीच कसोटी आहे, म्हणून आपण एक मजबूत वेगवान गोलंदाजी युनिट विकसित करणे महत्वाचे आहे," अशी कबुली त्यांनी दिली.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघमोहम्मद सिराज