मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील यजमान इंग्लंडचे मालिका जिंकण्याचं स्वप्न उद्धवस्त करत टीम इंडियाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. लोकेश राहुल आणि शुबमन गिल यांच्या खेळीनंतर वॉशिंग्टन संदुर आणि रवींद्र जडेजा या जोडीनं टीम इंडियाचा पराभव टाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् बेन स्टोक्सचा पोपट झाला
ज्या इंग्लंडच्या संघाने चौथ्या दिवसाअखेर सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती त्या संघाच्या कर्णधाराने सामना ड्रॉवर थांबवण्यासाठी हात पुढे केल्याचे पाहायला मिळाले. पण त्यावेळी जड्डूसह वॉशिंग्टन सुंदरनं स्पष्ट नकार दिला. सामना इथंच ड्रॉवर थांबुया अशी विनंती करणाऱ्या इंग्लंडच्या कॅप्टनचा चक्क पोपट झाला.
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
नेमकं कधी अन् काय घडलं?
भारताच्या डावातील १३८ व्या षटकानंतर वॉशिंग्टन सुंदर १८८ चेंडूत ८० तर दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा १७३ चेंडूत ८९ धावांवर खेळत होता. बेन स्टोक्सनं रवींद्र जडेजाच्या दिशेनं जात निकाल लागणार नाही आपण इथंच थांबूया, अशी ऑफर देत हस्तोंदलन करण्याचा डाव खेळला. पण जडेजाने त्याला साफ नकार दिला. ते माझ्या हातात नाही असा रिप्लाय त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना दिला. त्याआधी ड्रेसिंग रुममधून जोडीला खास संदेश आला होता. याच्या जोरावरच या दोघांनी शतकी खेळी केल्याशिवाय थांबणार नाही, असे म्हणत इंग्लंडच्या संघाला आणखी काही वेळ फिल्डिंग करायला भाग पाडले. एवढेच नाही ज्यासाठी हा डाव खेळला तोही साध्य केला. दोघांनी शतके झळकावली.
दोघांच्या भात्यातून आली नाबाद शतकी खेळी
रवींद्र जडेजानं १८५ चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०७ धावांची खेळी केली. त्याच्या शतकानंतर वॉशिंग्टन सुंदरनंही आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याने २०६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने शतक पूर्ण केल्यावर भारतीय खेळाडूंनी थांबण्याचा निर्णय घेतला अन् हा सामना अनिर्णित राहिला.