IND vs ENG, 4th T2O : मुंबईकरांनी टीम इंडियाची लाज वाचवली, सूर्यकुमार यादव अन् शार्दूल ठाकूरनं कमाल केली

IND vs ENG, 4th T2O :  शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) १७व्या षटकात सामना फिरवला. शार्दूलनं इंग्लंडच्या स्टोक्स व कर्णधार इयॉन मॉर्गन यांना सलग दोन चेंडूवर बाद केलं अन् टीम इंडियाच्या ताफ्यात नवचैतन्य संचारले. पण, शार्दूलने टाकलेल्या अखेरच्या षटकानं धाकधूक वाढवली होती,

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:17 PM2021-03-18T23:17:27+5:302021-03-18T23:23:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O: India beat England by 8 runs in 4th T20I, level 5-match series 2-2 | IND vs ENG, 4th T2O : मुंबईकरांनी टीम इंडियाची लाज वाचवली, सूर्यकुमार यादव अन् शार्दूल ठाकूरनं कमाल केली

IND vs ENG, 4th T2O : मुंबईकरांनी टीम इंडियाची लाज वाचवली, सूर्यकुमार यादव अन् शार्दूल ठाकूरनं कमाल केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरोमहर्षक सामन्यात शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला मिळवून दिला विजयटीम इंडियानं ८ धावांनी सामना जिंकत मालिकेत मिळवली २-२ अशी बरोबरीसूर्यकुमार यादवच्या ५७ धावा अन् शार्दूल ठाकूरच्या ३ विकेट्सनी फिरवला सामना

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे चौथ्या कसोटीत टीम इंडियाला दोन धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना टीम इंडियाला ८ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडच्या बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टोनं टीम इंडियाच्या हातून सामना खेचला होता, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) १७व्या षटकात सामना फिरवला. शार्दूलनं इंग्लंडच्या स्टोक्स व कर्णधार इयॉन मॉर्गन यांना सलग दोन चेंडूवर बाद केलं अन् टीम इंडियाच्या ताफ्यात नवचैतन्य संचारले. पण, शार्दूलने टाकलेल्या अखेरच्या षटकानं धाकधूक वाढवली होती, परंतु भारतानं सामना ८ धावांनी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडला ८ बाद १७७ धावा करता आल्या. शार्दूलनं ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ( India clinch a nail-biting contest by 8 runs to level the series 2-2) 

अखेरच्या षटकाचा थरार
इंग्लंडला विजयासाठी २३ धावांची गरज असताना जोफ्रा आर्चर व ख्रिस जॉर्डन हे गोलंदाज खेळपट्टीवर होते. शार्दूल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर १ धाव घेत जॉर्डननं आर्चरला स्ट्राईक दिली. त्यानंतर आर्चरनं चौकार व षटकार खेचून सामना ३ चेंडूत १२ धावा असा आणला. त्यानंतर शार्दूलनं सलग दोन चेंडू व्हाईड फेकले आणि इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूंत १० धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर १ धाव घेतल्यानं जॉर्डन स्ट्राईकवर गेला. पाचव्या चेंडूवर जॉर्डनला बाद करण्यात शार्दूलला यश आलं.  Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी अन् तिसऱ्या पंचाचा वादग्रस्त निर्णय...
सूर्यकुमार ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला.  सूर्यकुमारनं दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ४२ ( २७ चेंडू) आणि चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसह ४० ( २८) धावांची भागीदारी केली. रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांची १८ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरनं संपुष्टात आणली. रिषभ ३० धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या ११ धावांवर बाद झाला, बेन स्टोक्सनं सुपरमॅन कॅच घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर १८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर बाद झाला. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

हार्दिक पांड्याची २०१९नंतर पहिली विकेट...
२०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरनं उत्तुंग फटका मारला, तो आदिल राशिदनं तो टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला चिकटल्याचे स्पष्ट दिसत होते. वॉशिंग्टन सुंदरलाही ( Washington Sunder) चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आलं. जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला १५ धावांवर पहिला धक्का बसला. मागील सामन्यातील अर्धशतकवीर जोस बटलर ( ९) याला भुवनेश्वर कुमारनं बाद केलं. डेवीड मलान ३ धावांवर असताना शार्दूल ठाकूरकडून झेल सुटला. तो पकडणे थोडं अवघडचं होतं, परंतु त्यानं प्रयत्न केला. पहिल्या पॉवर प्लेत इंग्लंडनं १ बाद ४८ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं ऑक्टोबर २०१९नंतर पहिली ट्वेंटी-२० विकेट घेत इंग्लंडला तिसरा धक्का दिला.  Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना...
जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी तुफान फटकेबाजी करताना चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी आज महाग पडली. त्यानं ४ षटकांत ५२ धावा दिल्या. वॉशिंग्टननं पहिल्या षटकात १७, दुसऱ्या षटकात ५, तिसऱ्या षटकात १२ आणि चौथ्या षटकात १८ धावा दिल्या. पण, १५ व्या षटकात राहुल चहरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं बेअरस्टोला ( २५) झेलबाद करून माघारी पाठवले आणि स्टोक्ससोबतची ६५ ( ३६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. सुंदरनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच ४०+ धावा दिल्या. १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. बेन स्टोक्स २३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार मारून ४६ धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर इयॉन मॉर्गनही ( ४) माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडला कमबॅक करता आले नाही. 

Web Title: IND vs ENG, 4th T2O: India beat England by 8 runs in 4th T20I, level 5-match series 2-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.