IND vs ENG 4th Shubman Gill Create History WithCentury Equalled Sunil Gavaskars Record : भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मँचेस्टर कसोटीत संघ अडचणीत असताना दमदार शतकी खेळी साकारली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या भात्यातून आलेली हे चौथे शतक ठरले. यासह त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी घरच्या मैदानात एका कसोटी मालिकेत चार शतक मारल्याचा रेकॉर्ड आहे. शुबमन गिलनं इंग्लंड दौऱ्यावर ही कामगिरी करून दाखवलीये. एवढेच नाही तर त्याने एका कसोटी मालिकेत ७०० धावा करण्याचा मोठा डावाही साधला आहे.
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतक झळकवणारे कर्णधार
४ शतके- सर डॉन ब्रँडमन, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१९४७-४८ घरच्या मैदानात) ४ शतके- सुनील गावसकर, भारत विरुद्ध वेस्ट इंडिद (१९७८-७९ घरच्या मैदानात) ४ शतके- शुबमन गिल, भारत विरुद्ध इंग्लंड, २०२५ (इंग्लंड/ )*
विराट कोहलीचा विक्रम मोडला
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेआधी इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिलची कामगिरी खूपच खराब होती. पण या मालिकेत कॅप्टन्सीची जबाबदारी स्विकारल्यावर त्याने फलंदाजीत खास धमक दाखवल्याचे पाहायला मिळाले. मँचेस्टर कसोटी सामन्यातील शतकासह त्याने इंग्लंडच्या मैदानातील मालिकेत ७०० धावांचा पल्लाही पार केला. एका कसोटी मालिकेत ७०० पेक्षा अधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सुनील गावसकर यांच्याशिवाय यशस्वी जैस्वालनं अशी कामगिरी करून दाखवली होती. विराट कोहली राहुल द्रविडला जे जमलं नाही ते ७०० धावा करत गिलनं करून दाखवलं. विराट कोहलीनं २०१४ मधील इंग्लंड दौऱ्यात ६९२ धावा केल्या होत्या. हा विक्रम गिलनं मोडित काढला आहे.