Join us

KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...

लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर काय म्हणाला शुबमन गिल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 00:31 IST

Open in App

IND vs ENG 3rd Test Shubman Gill Statement After Loss Against England  : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १९३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजानं या सामन्यात ६१ धावांची नाबाद खेळी केली. पाचव्या आणि अखेरच्या दिवसातील खेळातील पहिल्या आणि अखेरच्या खेळातील तासाभराचा खेळ सोडला तर टीम इंडियाने इंग्लंडला चांगली टक्कर दिली. पण शेवटी इंग्लंडनं बाजी मारली अन् लॉर्ड्सचं मैदान मारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गिलनं टीमचं कौतुक केलं अन् चुकांबद्दलही बोलला

लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलनं तगडी फाइट दिल्याबद्दल संघाचं कौतुक केले आहे. पण यावेळी त्याने सामन्यात झालेल्या चुकाही सांगितल्या.पंतनं रन आउटच्या स्वरुपात गमावलेली विकेटसंदर्भात भाष्य करताना शुबमन गिलनं अन् लोकेश राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'संदर्भातील प्रश्नावरही उत्तर दिले आहे. सामन्यानंतर टीम इंडियाचा युवा कर्णधार नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर

IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती

पंत रन आउट झाला तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला

लॉर्ड्स कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात आघाडीच्या विकेट्स गमावल्यावर लोकेश राहुल आणि रिषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. पण ही जोडी फुटली अन् टीम इंडियाला पहिल्या डावात इंग्लंडप्रमाणेच ३८७ धावांवर समाधान मानावे लागले. रिषभ पंत रन आउट झाला तोच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला, असे शुबमन गिलनं म्हटले आहे. यासंदर्भात शुबमन गिल म्हणाला की, जर पंत त्यावेळी रन आउट झाला नसता तर आम्ही पहिल्या डावात ८०-१०० धावांची आघाडी घेऊ शकलो असतो. चौथ्या डावात १५० पेक्षा अधिक धावा करणं सोपे नसते, असा उल्लेखही शुबमन गिलनं केला.

KL राहुलची पाठराखण

 

पंतनं रन आउटच्या स्वरुपात गमावलेली विकेट मॅचचा टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटल्यावर शुबमन गिलला गेच लोकेश राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. कारण लोकेश राहुलच्या शतकासाठी पंतन चोरटी धाव घेतली होती. खुद्द लोकेश राहुलनेच याबद्दलची गोष्ट शेअर केली होती. त्यामुळेच वैयक्तिक माइलस्टोन गाठण्यासाठी अशा प्रकारे विकेट गमावणे किती योग्य आहे? ड्रेसिंग रुममध्ये यासंदर्भात चर्चा होते का? अशा आशयाचा प्रश्न शुबमन गिलला विचारण्यात आला. यावर शुबमन गिल म्हणाला की, पंतची रन आउटच्या स्वरुपातील विकेट ही जेजमेंट एररचा भाग होती. धाव घेण्यासाठी पंतनेच कॉल केला होता. लोकेश राहुल डेंजर एन्डला होता, असे सांगत लोकेश राहुलचा बचाव करत शुबमन गिलनं आम्ही वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या हितासंदर्भात आधी विचार करतो, असे म्हटले आहे.

दोन तासांच्या खराब फलंदाजीमुळे घात झाला

शुबमन गिलनं पराभवामागे आघाडीच्या फलंदाजीतील खराब कामगिरी कारणीभूत असल्याची गोष्टही मान्य केली. तो म्हणाला की, काल आणि आज (चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या खेळातील)  तासभरातील खेळ खराब राहिला. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. टॉप ऑर्डरमधील बॅटर्सकडून किमान ३०-४० धावांची अपेक्षा होती. पण पहिल्यांदाच या मालिकेत आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, असेही तो म्हणाला. 

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलरिषभ पंतलोकेश राहुल