Join us

IND vs ENG, 3rd T20, KL Rahul : लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण  

IND vs ENG, 3rd T20 : KL Rahul will be our main batters मागील तीन ट्वेंटी-20 सामन्यांत लोकेशची कामगिरी १, ०,० अशी राहिली आहे. तरीही सामन्यानंतर विराटनं त्याचा बचाव केला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:43 IST

Open in App

Ind Vs Eng T20 3rd Live Update Score : इंग्लंडनं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्स व १० चेंडू राखून सहज विजय मिळवला अन् पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ने आघाडी घेतली. दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्माचे ( Rohit Sharma) झालेले पुनरागमन संघासाठी फायद्याचे ठरले नाही. त्यात पदार्पणाच्या सामन्यात एकही चेंडू न खेळलेल्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) वगळून अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला ( KL Rahul) संधी दिल्यानं क्रिकेटप्रेमी नाराज होते. त्यात लोकेशनं पुन्हा कर्णधाराच्या विश्वासाला तडा दिला अन् भोपळा न फोडताच माघारी परतला. मागील तीन ट्वेंटी-20 सामन्यांत लोकेशची कामगिरी १, ०,० अशी राहिली आहे. तरीही सामन्यानंतर विराटनं त्याचा बचाव केला. #INDvsENG T20I  विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!

विराट कोहली म्हणाला,''माझ्या खेळीनं संघानं विजय मिळवला असता, तर मला नक्की आनंद झाला असता. ज्या खेळीनं संघाला मदत मिळत नाही, अशी खेळी कुणालाही करायला आवडत नाही. खेळपट्टी चांगली होती आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य मारा केला. या खेळपट्टीवर भागीदारी होणं महत्त्वाचे होते आणि आमच्याकडून एकच भागीदारी झाली. दोन सामन्यांपूर्वी माझी कामगिरी चांगली झाली नव्हती. लोकेश राहुल संघाचा चॅम्पियन खेळाडू आहे आणि रोहित शर्मासह तो आमचा प्रमुख फलंदाज आहे.'' विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रमविराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. हार्दिक पांड्यानं १७ धावांचे योगदान दिले आणि टीम इंडियानं ६ बाद १५६ धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियानं अखेरच्या पाच षटकांत ६९ धावा चोपल्या. पण, भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या धावांवर लगाम लावता आला नाही. जोस बटलरनं ( Jos Buttler) यानं एकहाती सामना फिरवला. बटलरनं ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला.   सूर्यकुमार यादवला एकही चेंडू न खेळवता बाकावर बसवलं, काय आहे विराट कोहलीचा प्लान?

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीलोकेश राहुल