India vs England Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघानं आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघानं दुसऱ्या सामन्यासाठीही एक दिवस आधीच संघात कोण कोण खेळणार ते जग जाहीर केलं आहे. दुसरीकडे भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन ही सामन्याची नाणेफेक होईल, त्यावेळीच समोर येईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालिकेत कमबॅक करण्यासाठी बदलासह मैदानात उतरणार इंग्लंड
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय नोंदवत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघातील दुसरा सामना चेन्नईच्या मैदानात रंगणार आहे. मालिकेत कमबॅक करण्यासाठी इंग्लंडचा संघ बदलासह मैदानात उतरणार आहे.
इंग्लंडच्या संघानं या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या टी २० सामन्यासाठी गोलंदाजीत एक बदल केला आहे. गस ॲटकिन्सनच्या जागी त्यांनी ब्रायडन कार्स याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. गस ॲटकिन्सन यानं पहिल्या सामन्यात २ षटकात ३८ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. इंग्लंडच्या ताफ्यातील हा खेळाडू फलंदाजी करण्यातही माहीर आहे. पण पण इथंही त्याला छाप सोडता आली नव्हती. १३ चेंडूत फक्त त्याने ३ धावा केल्या होत्या.
जेमी स्मिथला बारावा खेळाडू
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या सामन्यासाठी आखलेल्या रणनीतीमध्ये जेमी स्मिथला बारावा खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. जो गरज पडल्यास मैदानात उतरु शकतो. चेन्नईच्या मैदानात रंगणारा सामना इंग्लंडसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण हा सामना गमावला तर त्यांना मालिकेत कमबॅक करणं अधिक मुश्किल होईल.
दुसऱ्या टी २० साठी इंग्लंडचा संघ
बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरनट, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वूड.