भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटकच्या मैदानात सुरु आहे. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही सलामीवीर मागे फिरल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेले जो रुट आणि हॅरी ब्रूक जोडी सेट झाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षित राणानं बॉलिंगवर शुबमन गिलचा जबरदस्त कॅच अन् फुटली सेट झालेली जोडी
एका बाजूला जो रुटनं अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूकही चांगले खेळत होता. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर ब्रूकनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुबमन गिलच्या सर्वोत्तम धाटणीतील क्षेत्ररक्षणामुळे त्याचा हा प्रयत्न फसला. धावात जात शुबमन गिलनं एक अप्रतिम कॅच पकडला आणि इंग्लंडची सेट झालेली ही जोडी फुटली. हॅरी ब्रूकनं ५२ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. रुटच्या साथीनं त्याने ६६ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिलच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला ही जोडी फोडण्यात यश आले.