Join us

IND vs ENG, 2nd ODI : टीम इंडियात आणखी एकाचे पदार्पण, श्रेयस अय्यरच्या जागी स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, जाणून घ्या Playing XI

India vs England, 2nd ODI : भारतानं पहिला सामना नाट्यमयरित्या जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:50 IST

Open in App
ठळक मुद्देशुक्रवारी होणार दुसरा वन डे सामना, टीम इंडियाकडे १-० अशी आघाडीपहिल्या सामन्यात रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांना झालेली दुखापत

India vs England, 2nd ODI : भारतानं पहिला सामना नाट्यमयरित्या जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या ५ बाद ३१७ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गडगडला. भारतानं विजय मिळवला असला तरी संघातील दोन प्रमुख खेळाडू जायबंदी झाले आणि ते मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी परतले नाही. त्यापैकी एक श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) खांद्याची दुखापत गंभीर असल्यानं त्याला मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आणि आयपीएल ( IPL 2021) मध्येही तो दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) नेतृत्व करू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी उद्याच्या सामन्यात आणखी एक खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघ दुसऱ्या वन डे सामन्यात एका बदलासह मैदानावर उतरून विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.  गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य!

सूर्यकुमार यादवचे वन डे पदार्पणपहिल्या वन डे सामन्यात कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी वन डे टीममध्ये पदार्पण केलं. आता श्रेयसच्या माघारीमुळे दुसऱ्या वन डेत सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) पदार्पणाची संधी मिळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून मुंबईच्या सूर्यकुमारनं टीम इंडियात पदार्पण केलं. त्याला पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती, परंतु त्यानंतरच्या सामन्यात त्यानं आक्रमक फटकेबाजी केली.

कुलदीप यादवला मिळणार आणखी एक संधी गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता कमी आहे. भुवनेश्वर कुमारनं दुखापतीतून सावरताना चांगले पुनरागमन केलं. प्रसिद्ध कृष्णा व शार्दूल ठाकूर यांनीही पहिल्या सामन्यात अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या. फिरकीपटू कुलदीप यादवला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.  

इंग्लंडच्या संघात दोन बदलइंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि सॅम बिलिंग यांना पहिल्या वन डे सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या वन डेत त्यांची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. अशात लायम लिव्हिंगस्टोन व डेवीड मलान यांना संधी मिळू शकते. गोलंदाजीत टॉम कुरन याचे स्थान धोक्यात आहे.  

संभावित प्लेइंग इलेव्हन 

भारत - विराट कोहली , रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड - जॉस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, डेवीड मलान, बेन स्टोक्स, लायम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, आदिल राशिद, मार्क वूड, रीस टॉपली.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसूर्यकुमार अशोक यादवकुलदीप यादव