आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. इंग्लंड दौरा हा नेहमीच आव्हानात्मक असतो. त्यात शुबमन गिलला बॅटिंगसह नेतृत्वाची छाप सोडण्याची दुहेरी भूमिका पार पाडायची आहे. हे आव्हान सोपे नाही. त्यात त्याची आकडेवारी आणखी टेन्शन वाढवणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडविरुद्ध तो बरा खेळला, पण इंग्लंडमध्ये खेळताना कमी पडलाय
शुबमन गिलनं बॅटरच्या रुपात अल्पावधित आपली खास छाप सोडलीये. त्याला टीम इंडियातील प्रिन्स म्हणूनही ओळखले जाते. पण इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळताना त्याची आकडेवारी फारशी चांगली दिसत नाही. इथं एक नजर टाकुयात टीम इंडियातील प्रिन्सच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी कामगिरीवर...
Shubman Gill Test Captaincy Team India, IND vs ENG: "टीम इंडियात जागा मिळण्याचे वांदे असलेल्याला कॅप्टन कसा...
आतापर्यंत कशी राहिलीये गिलची कसोटीतील कामगिरी?
शुबमन गिलनं आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यात ५ शतके आणि ७ अर्धशतकाच्या मदतीने ३५.०५ च्या सरासरीसह ५९.९२ च्या स्ट्राइक रेटनं १८९३ धावा केल्या आहेत. यात इंग्लंड विरुद्ध त्याने १० सामने खेळले असून यात ३ च्या सरासरीने त्याने ५९२ धावा केल्या आहेत. यात २ शतकासह तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडमध्ये एकही अर्धशतक नाही
इंग्लंड विरुद्ध शुबमन गिलचे आकडे चांगली असले तरी इंग्लंडच्या मैदानात त्याची आकडेवारी घसरल्याचे दिसून येते. इंग्लंडच्या मैदानात सेंच्युरी सोडा त्याच्या भात्यातून एकही अर्धशतक पाहायला मिळालेले नाही. इंग्लंडमध्ये शुबमन गिलनं ३ सामन्यातील ६ डावात १४४.६६ च्या सरासरीसह ५५.६९ स्ट्राइक रेटनं फक्त ८८ धावा केल्या आहेत.
कॅप्टन्सीसह फलंदाजीत धमक दाखवण्याचे चॅलेंज
इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंत भारतीय संघाने फक्त ३ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. अजित वाडेकर, कपिल देव आणि राहुल द्रविड वगळता अन् भारतीय संघाच्या कसोटी कर्णधाराला इंग्लंडच्या मैदानात अपयश आले आहे. त्यामुळे शुबमन गिलसमोर कॅप्टन्सीत छाप सोडण्याचे मोठे चॅलेंज असेल. याशिवाय फलंदाजीतही त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागले.
Web Title: IND vs ENG 2025 Team India New Captain Shubman Gill Stats And Records vs England In Test Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.