India vs England, 1st Test : रिषभ पंत-चेतेश्वर पुजारा संकटमोचक; पण, टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट कायम

IND vs ENG, 1st Test : चेतेश्वर पुजारा व रिषभ पंत यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण, शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर दोघंही एकापाठोपाठ माघारी परतले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 05:11 PM2021-02-07T17:11:10+5:302021-02-07T17:21:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st Test : Stumps on Day 3 - India 257 for 6, they need 121 runs to avoid the follow on | India vs England, 1st Test : रिषभ पंत-चेतेश्वर पुजारा संकटमोचक; पण, टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट कायम

India vs England, 1st Test : रिषभ पंत-चेतेश्वर पुजारा संकटमोचक; पण, टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतलारिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्यातिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाच्या ६ बाद २५७ धावा झाल्या आहेत

 India vs England, 1st Test Day 3: टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण, शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर दोघंही एकापाठोपाठ माघारी परतले. चेतेश्वर पुजारा तर विचित्र पद्धतीनं बाद झाला. रिषभचे शतक पुन्हा एकदा हुकले. हे दोघं खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टळेल असे वाटले होते, परंतु ते अजूनही कायम आहे. वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय

मॅचचे हायलाईट्स

 - जो रुटच्या ( Joe Root) द्विशतकाच्या जोरावर आणि अन्य फलंदाजांच्या महत्त्वाच्या खेळींमुळे इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. पण, जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) चौथ्याच षटकात अप्रतिम बाऊन्सर टाकून रोहितला ( Rohit Sharma) स्तब्ध केलं. शुबमन गिलला ( Shubman Gill) आर्चरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारणे महागात पडले. ३८ वर्षीय जेम्स अँडरसननं अफलातून झेल घेतला. चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 


- विराट कोहली  (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या विराटकडून अपेक्षाभंग झाला. डॉम बेसनं ( Dom Bess) विराटला ११ धावांवर माघारी पाठवला. बेसनं टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. अजिंक्यचा ( १) ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) याने अविश्वसनीय झेल घेतला. गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

- त्यानंतर आलेल्या रिषभनं आक्रमक खेळी करताना अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीनंतर भारतात कसोटीतील पहिल्या तीन डावांत अर्धशतक करणारा रिषभ पंत हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. रिषभ-चेतेश्वर या जोडीनं पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.


- डॉम बेसनं ही भागीदारी संपुष्टात आणली. चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली.  पुजारानं मारलेला फटका शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूच्या पाठीवर आदळला आणि शॉर्ट मिडविकेटवर उभ्या असलेल्या रोरी बर्न्सनं सहज तो टिपला  सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

- त्यानंतर रिषभ पंतही बेसच्या गोलंदाजीवर बाद झाला. उत्तुंग फटका मारण्याचा रिषभचा प्रयत्न फसला आणि लिचनं त्याचा झेल घेतला. रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. तो चौथ्यांदा नव्हर्स ९०वर बाद झाला. याआधी २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सौराष्ट्र व हैदराबाद कसोटीत तो ९२-९२ धावांवर बाद झाला होता.  त्यानंतर २०२१च्या सिडनी कसोटीत ९७ धावांवर बाद झाला. 


- तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाच्या ६ बाद २५७ धावा झाल्या आहेत. टीम इंडिया अजूनही ३२१ धावांनी पिछाडीवर असून त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी १२१ धावा कराव्या लागणार आहेत. आर अश्विन ( ८) व वॉशिंग्टन सुंदर ( ३३) हे तामिळनाडूचे दोन खेळाडू खिंड लढवत आहेत. 

इंग्लंडच्या डॉम बेसनं चार विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चरनं दोन बळी टिपले.

Web Title: IND vs ENG, 1st Test : Stumps on Day 3 - India 257 for 6, they need 121 runs to avoid the follow on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.