गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडनं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला जोरदार धक्के बसले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 01:06 PM2021-02-07T13:06:06+5:302021-02-07T13:06:32+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir Doesn't Want Jasprit Bumrah in Second Test, Find Out Why | गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला Playing XI मध्ये खेळवू नये असे मत व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरत तो या मालिकेतून पुनरागमन केलं. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत तो टीम इंडियाचा सदस्य आहे आणि त्यानं ३६ षटकांत ८४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.   भारताचे ओपनर स्वस्तात माघारी; टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट?

या मालिकेचा कालावधी लक्षात घेता बुमराहच्या वर्कलोडचा संघ व्यवस्थापनानं विचार करावा, असे मत गंभीरनं व्यक्त केले. भारताकडे मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर हे दोन पर्याय दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यास हरकत नाही, असे गंभीरला वाटते. तो म्हणाला,''जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत खेळवतील की नाही याबाबत खात्री नाही. पण, टीम इंडियानं त्याला विश्रांती द्यायला हवी. पिंक बॉल कसोटीसाठी तो संघात हवा. तिसऱ्या कसोटीत तो X फॅक्टर ठरू शकतो.''  

''जसप्रीत बुमराहला तुम्ही दीर्घ स्पेल टाकालया लावू नका. त्याला सातत्यानं गोलंदाजी करायला लावल्यास, त्याच्यावरील वर्क लोड वाढत जाईल. या मालिकेचा कालावधी लक्षात घेता, त्याला विश्रांती द्यायला हवी. अन्यथा भारतीय संघासमोरील अडचण अधिक वाढेल,''असेही गंभीर म्हणाला.  सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

दरम्यान, इंग्लंडनं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला जोरदार धक्के बसले. जो रुट ( Joe Root) च्या २१८ धावा, डॉम सिब्ली ( ८७) व बेन स्टोक्स ( ८२) यांची अर्धशतकी खेळी आणि रोरी बर्न्स ( ३३), ऑली पोप ( ३४), जोस बटलर ( ३०) व डॉम बेस ( ३४) यांच्या योगदानाच्या जोरावर इंग्लंडनं ही मोठी मजल मारली. पण, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) यांना मोठी खेळी करण्यापासून इंग्लंडच्या गोलंदाजांनी रोखले. विराट कोहलीही ( Virat Kohli) ११ धावा करून माघारी परतला. 

Web Title: Gautam Gambhir Doesn't Want Jasprit Bumrah in Second Test, Find Out Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.