Join us

India vs England, 1st Test : ५ ओव्हर्स, ३ मेडन, ६ धावा अन् ३ विकेट्स; जेम्स अँडरसन जोमात, टीम इंडिया कोमात! 

India vs England, 1st Test Day 5 : जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) एका स्पेलनं भारतविरुद्ध इंग्लंड कसोटीचे चित्रच ...

By स्वदेश घाणेकर | Updated: February 9, 2021 12:03 IST

Open in App
ठळक मुद्देलंच ब्रेकपर्यंत भारताच्या ६ बाद १४४ धावा झाल्या आहेत. पराभव टाळण्यासाठी उर्वरित ६४ षटकं खेळून काढायची आहेत आणि विजयासाठी २७६ धावा करायच्या आहेत. इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे

India vs England, 1st Test Day 5 : जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) एका स्पेलनं भारतविरुद्ध इंग्लंड कसोटीचे चित्रच बदलले. ४२० धावांच्या लक्ष्याचा पाचव्या दिवशी पाठलाग करणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती, त्यामुळे टीम इंडिया पहिला सामना ड्रॉ खेळण्याच्या दिशेनं खेळतील असा अंदाज होता. पण, जॅक लिचनं ( Jack Leach) चेतेश्वर पुजाराचे ( Cheteshwar Pujara) लक्ष विचतिल केलं आणि सुरेख चेंडूवर बेन स्टोक्सच्या हातून झेलबाद होऊन माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर ३८ वर्षीय अँडरसननं कहर केला. दुसऱ्या स्पेलच्या पहिल्याच षटकात चार चेंडूत त्यानं टीम इंडियाला दोन धक्के दिले, त्यानंतर पुढील षटकात रिषभ पंतला बाद केलं.  On This Day: १५ धावांत संपूर्ण संघ परतला माघारी, ४५ मिनिटांत खेळ संपला; क्रिकेटच्या मैदानावरील धक्कादायक सामना

लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ६ बाद १४४ धावा झाल्या आहेत. पराभव टाळण्यासाठी उर्वरित ६४ षटकं खेळून काढायची आहेत आणि विजयासाठी २७६ धावा करायच्या आहेत. इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे. अँडरसननं दुसऱ्या स्पेलमध्ये ५ षटकं फेकली आणि त्यापैकी ३ निर्धाव षटकं फेकली व ६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.   ३८ वर्षीय जेम्स अँडरसनचा भारी पराक्रम, टीम इंडियाला ढकललं पराभवाच्या छायेत

१ बाद ३९ धावसंख्येवरून पाचव्या दिवशी पराभव टाळण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची हालत खराब झाली आहे. रोहित शर्माचा त्रिफळा उडवणाऱ्या जॅक लीचनं सकाळच्या सत्रात चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवून टीम इंडियाला धक्का दिलाच होता. पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची घरच्या मैदानावर अशी अवस्था होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. चेतेश्वर पुजारा १५ धावांवर बाद झाला. शुबमन गिलनं ८३ चेंडूंत ५० धावा केल्या, उपकर्णधार अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. रिषभ पंत ११ धावांवर माघारी परतला, तर वॉशिंग्टन सुंदर ( ०) डॉम बेसच्या गोलंदाजीवर बाद झाला. What a Ball!; जेम्स अँडरसनचे चार चेंडू अन् टीम इंडियाला दोन जबरदस्त धक्के, Video 

पाहा पाचव्या दिवसातील विकेट्स अन् गिलची अर्धशतकी खेळी...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनरोहित शर्माचेतेश्वर पुजाराशुभमन गिलअजिंक्य रहाणेरिषभ पंत