India vs England, 1st Test : जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video  

IND vs ENG, 1st Test : विराट कोहली  (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 01:39 PM2021-02-07T13:39:55+5:302021-02-07T13:40:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st Test : Joe Root takes a stunning catch at cover & Ajinkya Rahane departs for one, India are 73-4, Video | India vs England, 1st Test : जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video  

India vs England, 1st Test : जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test Day 3: टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं आहे. जो रुटच्या ( Joe Root) द्विशतकाच्या जोरावर आणि अन्य फलंदाजांच्या महत्त्वाच्या खेळींमुळे इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. घरच्या मैदानावर खेळणारी टीम इंडिया हा डोंगर सहज पार करून विक्रमाचा एव्हरेस्ट उभा करतील, असे स्वप्न क्रिकेटचाहते पाहत होते. पण, जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) भारतीयांना स्वप्नातून खडबडून जागं केलं. त्यानं चौथ्याच षटकात अप्रतिम बाऊन्सर टाकून रोहितला ( Rohit Sharma) स्तब्ध केलं. शुबमन गिलला ( Shubman Gill) आर्चरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारणे महागात पडले. ३८ वर्षीय जेम्स अँडरसननं अफलातून झेल घेतला.  गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

विराट कोहली  (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या विराटकडून अपेक्षाभंग झाला. डॉम बेसनं ( Dom Bess) विराटला ११ धावांवर माघारी पाठवला. बेसनं टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. अजिंक्यचा ( १) ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) याने अविश्वसनीय झेल घेतला. सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

पाहा व्हिडीओ...



Web Title: IND vs ENG, 1st Test : Joe Root takes a stunning catch at cover & Ajinkya Rahane departs for one, India are 73-4, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.