'बाहुबली'तील 'त्या' डायलॉगवरून बांगलादेशची खिल्ली; सोशलवर मिम्स व्हायरल!

दिनेश कार्तिकने बांगलादेशच्या तोंडाशी आलेल्या विजयाचा घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 11:07 IST2018-03-19T11:07:04+5:302018-03-19T11:07:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ind vs bangladesh final match Nidahas trophy viral memes on social media | 'बाहुबली'तील 'त्या' डायलॉगवरून बांगलादेशची खिल्ली; सोशलवर मिम्स व्हायरल!

'बाहुबली'तील 'त्या' डायलॉगवरून बांगलादेशची खिल्ली; सोशलवर मिम्स व्हायरल!

मुंबई: निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी भारताने बांगलादेशवर थरारक असा विजय मिळवला. भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अवघ्या 8 चेंडूत 29 धावा कुटत विजयाचे पारडे भारताच्या बाजून झुकवले. या अशक्यप्राय विजयानंतर साहजिकच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरूवात झाली. यापैकी अनेक मजेशील मिम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहेत. 

निदहास चषक मालिकेत विजय मिळवल्यानंतर बांगलादेशी खेळाडुंकडून करण्यात येणारा नागीण डान्स गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या संपूर्ण संघाने मैदानात नागीन डान्स केला होता. कालच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय संघ हरेल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. असे झाले असते तर बांगलादेशी खेळाडुंना टीम इंडियाला डिवचण्याची संधी मिळाली असती. परंतु, दिनेश कार्तिकने बांगलादेशच्या तोंडाशी आलेल्या विजयाचा घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला. त्यानंतर बांगलादेशी खेळाडुंचे चेहरे उतरले होते. 
 







 

Web Title: Ind vs bangladesh final match Nidahas trophy viral memes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.