IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्याबोटाला दुखापत झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 08:49 PM2022-12-07T20:49:37+5:302022-12-07T20:50:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN Update Big update about Rohit Sharma Rahul Dravid gave important information miss third odi deepak chahar kuldeen sen out of tournament | IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 2nd ODI Updates : बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो बोटाला पट्टी बांधून ड्रेसिंग रूममध्ये परतला. दरम्यान, रोहित शर्मा सामन्यात फलंदाजी करणार नाही असं वाटत असतानाच तो ९ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. परंतु तळाच्या फलंदाजांकडून फार साथ न मिळाल्याने रोहितचा संघर्ष अयशस्वी ठरला. रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण शेवटच्या चेंडूवरील फटका हुकला अन् ५ धावांनी बांगलादेशने हा सामना जिंकला. दरम्यान, या मालिकेत त्याच्या खेळण्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्मा, कुलदीप सेन आणि दीपक चाहर यांच्या पुढील मालिकेतील सहभागासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. रोहित शर्मा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसून तो मुंबईतला परतणार आहे. त्या ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचं राहुल द्रविड यांनी सांगितलं. याशिवाय कुलदीप सेन आणि दीपक चाहर हेदेखील मालिकेतून बाहेर जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

रोहित शर्माचीतुफान फलंदाजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित प्रथमच ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आता भारताकडून ८ वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मागील वेळी २०१४ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध मिरपूरच्या याच स्टेडियमवर तो सलामीसोडून दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दरम्यान, सामन्यात महमुदुल्लाहने ४७व्या षटकात केवळ १ धाव देत टीम इंडियावर दडपण वाढवले आणि आता १८ चेंडूंत ४० धावा भारताला करायच्या होत्या. बांगलादेशचे गोलंदाज सिराजला एक धाव घेऊच देत नव्हते आणि त्यामुळे रोहित नॉन स्ट्राईकर एंडला उभाच राहिला.  सिराजही वैतागला होता आणि मुस्ताफिजूर रहमानने ४८वे षटक  निर्धाव फेकले. महमुदुल्लाहचा पहिलाच चेंडू रोहितने षटकार खेचला आणि हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५००वा षटकार ठरला. ख्रिस गेलनंतर असा पराक्रम करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला. 

अखेरच्या षटकात रोहितनं जबरदस्त फलंदाजी केली. अखेरच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना रोहितचा षटकार चुकला आणि बांगलादेशनं सामना ५ धावांनी जिंकत मालिकाही आपल्या खिशात टाकली.

Web Title: IND vs BAN Update Big update about Rohit Sharma Rahul Dravid gave important information miss third odi deepak chahar kuldeen sen out of tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.