पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral

IND vs BAN : भारतात होणारा वर्ल्ड कप प्रेक्षकांच्या असभ्य वर्तनामुळे अधिक चर्चेत राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 04:00 PM2023-10-21T16:00:10+5:302023-10-21T16:01:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN : Shoaib Ali, Bangladesh's superfan, fondly known as 'Tiger Shoaib' has faced harassing behavior from the Indian fans in the India vs Bangladesh match in Pune, Video  | पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral

पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs BAN : भारतात होणारा वर्ल्ड कप प्रेक्षकांच्या असभ्य वर्तनामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील अहमदाबाद येथील लढतीत चाहत्यांकडून पाकिस्तानी खेळाडूंना दिला गेलेला त्रास ताजा असताना आता बांगलादेशच्या सुपर फॅन शोएब अलीसोबतही गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी बांगलादेशवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत पूर्ण केले. विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी करून प्लेअऱ ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. पुण्यात झालेल्या या सामन्यात भारताच्या काही चाहत्यांची हुल्लडबाजी समोर आली आहे. 


या सामन्यात लिटन दास ( ६६), तनझीद हसन ( ५१), महमुदुल्लाह ( ४६) व मुश्फिकर रहिम ( ३८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने ८ बाद २५६ धावा केल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ४८) व शुबमन गिल (५३) यांनी ८८ धावांची भागीदारी केली. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला, तर श्रेयस अय्यर १९ धावांवर बाद झाला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 


या सामन्यात बांगलादेशचा सुपर फॅन शोएब अली याच्यासोबत काही चाहत्यांनी गैरवर्तन केले. त्याला त्रास दिला गेला आणि नेहमी हा चाहता सोबत वाघाचा टेडी ठेवतो, चाहत्यांनी तो टेडी फाडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. बांगलादेशच्या मीडियाकडून या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. 

Web Title: IND vs BAN : Shoaib Ali, Bangladesh's superfan, fondly known as 'Tiger Shoaib' has faced harassing behavior from the Indian fans in the India vs Bangladesh match in Pune, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.