Ind Vs Ban: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, कर्णधारासह हा दिग्गज खेळाडू संघाबाहेर

Ind Vs Ban: गेल्या काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेशमधील सामने कमालीचे अटीतटीचे होतात. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे या मालिकेकडे लक्ष आहे. मात्र या मालिकेपूर्वी यजमान बांगलादेशच्या संघाला जबर धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:52 AM2022-12-02T09:52:13+5:302022-12-02T09:52:58+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs Ban: Big blow to Bangladesh ahead of ODI series against India, captain along with legendary player out of squad | Ind Vs Ban: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, कर्णधारासह हा दिग्गज खेळाडू संघाबाहेर

Ind Vs Ban: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, कर्णधारासह हा दिग्गज खेळाडू संघाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ढाका - भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेट संघांमध्ये रविवारपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघा बांगलादेशमध्ये दाखल झाल आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेशमधील सामने कमालीचे अटीतटीचे होतात. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे या मालिकेकडे लक्ष आहे. मात्र या मालिकेपूर्वी यजमान बांगलादेशच्या संघाला जबर धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल दुखापतीमुले मालिकेतून बाहेर पडला आहे. तर वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद हाही दुखापतीमुळे पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे. 
 
तमीम इक्बाल आणि तस्किन अहमद यांना झालेल्या दुखापतीची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष मिनहाजूल अबेदिन यांनी दिली आहे.  बांगलादेशच्या संघाने एकदिवसीय मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा केलेली आहे. या संघाचं कर्णधारपद तमीम इक्बालकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र तमिम इक्बालला ३० नोव्हेंबर रोजी मीरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियम सराव करत असताना दुखापत झाली होती. आता तमिमच्या अनुपस्थितीत बांगलादेशचं नेतृत्व करेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला ४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना ७ डिसेंबर आणि तिसरा सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाईल.  

बांगलादेशचा वनडे संघ - 
लिटन दास, अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला. 
बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 
 

Web Title: Ind Vs Ban: Big blow to Bangladesh ahead of ODI series against India, captain along with legendary player out of squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.