Join us

Ind Vs Ban 2nd Test: ‘आता शर्टही…’ टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटने डिवचले, व्हिडीओ व्हायरल 

Ind Vs Ban 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीचं आक्रमक रूप क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. फलंदाजीदरम्यान, टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटच्या या आक्रमकतेचा चांगलाच प्रसाद मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 14:54 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मैदावर खूप सक्रिय असतो. फिल्डिंग करत असताना तो फॅन्सचा उत्साह वाढवत असतो. त्याबरोबरच प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याचं कामही करत असतो. त्याचा आक्रमकपणा प्रेक्षकांनाही खूप भावत असतो. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीचं आक्रमक रूप क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. फलंदाजीदरम्यान, टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटच्या या आक्रमकतेचा चांगलाच प्रसाद मिळाला.

हा संपूर्ण घटनाक्रम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात घडला. त्यावेळी बांगलादेशचा दुसरा डाव सुरू झाला होता. तसेच प्रकाशही अंधूक होता. तेव्हा बांगलादेशचे फलंदाज वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावत होते. दरम्यान, सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर नजमूल हुसेन शंतो याने आपल्या शुजचे लेन्स बांधण्यास सुरुवात केली.

त्यानंतर विराट कोहलीने वेळ घालवत असलेल्या नजमूल हुसैन शंतोला सुनावण्यास सुरुवात केली. विराटने त्याचं शर्ट खेचून आता हेही खोलून टाक, असे सांगण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नजमूल हुसेन वेळ घालवत असल्याची ही एकच वेळ नव्हती. त्याने आधीही वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला. आधी त्याने बांगलादेशचा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा शंतोने बॅट बदलण्यासाठी पॅव्हेलियनच्या दिशेने इशारा केला होता. मात्र अतिरिक्त खेळाडू जेव्हा बॅट घेऊन आला तेव्हा शंतोने नवी बॅट घेण्याऐवजी जुन्या बॅटसहच खेळणे पसंद केले.   

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहली
Open in App