Join us

IND vs BAN 2nd Test Live : लोकेश राहुलला झालेली दुखापत, त्यात बांगलादेशने टॉस जिंकला; कुलदीप यादवला बाकावर बसवले 

India vs Bangladesh 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:38 IST

Open in App

India vs Bangladesh 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजय मिळवला आहे. आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. WTC Final च्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांचे टीम इंडियासमोर आव्हान आहे. त्यामुळे उर्वरित ५ ( १ बांगलादेश व ४ ऑस्ट्रेलिया) कसोटी जिंकून आपलं स्थान भारताला पक्कं करायचं आहे. ऑस्ट्रेलिया जवळपास फायनलमध्ये पोहोचलीच आहे. त्यामुळे भारतासाठी ही दुसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. काल सराव करताना लोकेश राहुलला झालेली दुखापत चिंता वाढवणी होती. 

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळेल अशी अपेक्षाही फोल ठरली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात अंगठ्याला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही आणि त्यामुळे त्याने माघार घेतली. लोकेश आज खेळणार की नाही यावर साशंकता होती, परंतु लोकेश नाणेफेकीला आला अन् जीव भांड्यात पडला. पण, कुलदीप यादवला आजच्या सामन्यात बाकावर बसवण्यात आले. पहिल्या कसोटीत मॅन ऑफ दी मॅच जिंकणाऱ्या कुलदीपला बाहेर बसवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या जागी जयदेव उनाडकतला संधी मिळाली. १२ वर्षांनंतर जयदेव  भारताकडून कसोटी खेळणार आहे. 

भारताचा संघ - शुभमन गिल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, जयदेव उनाडकत , उमेश यादव, मोहम्मद सिराज   

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशकुलदीप यादवलोकेश राहुल
Open in App