Join us

IND vs BAN 2nd ODI Live : रोहित शर्माला दुसऱ्याच षटकात सोडावे लागले मैदान, समोर आलंय चिंतेचं कारण, जाणून घ्या अपडेट्स

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज  मैदानावर उतरला आहे .

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:53 IST

Open in App

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज  मैदानावर उतरला आहे . त्यात दुखापतीचे ग्रहण काही केल्या पाठ सोडेना. पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता. त्यात कुलदीप सेनची पाठ दुखायला लागली आणि तो दुसऱ्या वन डे सामन्यात खेळत नाहिय... त्यात भर पडली ती रोहित शर्माची ( Rohit Sharma)... दुसऱ्याच षटकात रोहितला मैदान सोडावे लागले आहे. 

शमी, रिषभ पाठोपाठ भारताचा आणखी एक खेळाडू जखमी; दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली

बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने पुन्हा नाणेफेक जिंकली, परंतु यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात दोन बदल झाले आहेत. अक्षर पटेल व उम्रान मलिक यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून शाहबाद अहमद व कुलदीप सेन यांना बाहेर जावे लागले आहे. कुलदीपने पहिल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या पाठ दुखावली गेली आणि बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे रोहितने सांगितले. 

अनामुल हक व लिटन दास यांनी चांगली सुरुवात करून दिली. अनामुलने काही चांगले फटकेही मारले आणि ९ चेंडूंत ११ धावा केल्या. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात अनामुलने हे चौकार खेचले, परंतु चौथ्या चेंडूवर स्लीपमध्ये रोहितकडून त्याचा झेल सुटला.  चेंडू एवढ्या वेगाने रोहितच्या डाव्या हातावर आदळला की त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याने लगेच मैदानाबाहेर जाणे योग्य समजले. ड्रेसिंग रुममध्ये बसून तो मॅच पाहतोय... सिराजने पुढच्याच षटकात अनामुलला पायचीत केले खरे, परंतु रोहितच्या दुखापतीने सर्वांचे टेंशन वाढलेय... 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मामोहम्मद सिराज
Open in App