Join us

IND vs BAN 1st ODI: रोहितबरोबर ओपनर कोण? अशी असू शकते Team India Playing XI

आज रंगणार भारताचा बांगलादेशशी पहिला वन डे सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 09:59 IST

Open in App

IND vs BAN 1st ODI, Team India Predicted Playing XI: भारतीय संघ आजपासून (४ डिसेंबर) बांगलादेश दौऱ्याला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघांमधील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. वन डे मालिकेसाठी टीम इंडिया तब्बल सात वर्षांनी बांगलादेशमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१५ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर वन डे मालिका खेळली होती. त्या मालिकेत भारत बांगलादेशकडून पराभूत झाला होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो नक्कीच दमदार प्लेइंग ११ खेळवणार हे नक्की. जाणून घेऊया कसा असू शकतो संघ.

रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

बांगलादेश दौऱ्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माशिखर धवनसोबत सलामी करताना दिसेल असा अंदाज आहे. त्यामुळे मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहली (Virat Kohli) याच्यासह केएल राहुल (KL Rahul) कडे येऊ शकते. यष्टीरक्षक म्हणून फक्त रिषभ पंत (Rishabh Pant) खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी आणि ईशान किशन या युवा खेळाडूंना संधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

जायबंदी शमीच्या अनुपस्थितीत कोण खेळणार?

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वन डे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या उजव्या खांद्यावर दुखापत झाली होती. त्याच्या जागी उमरान मलिकचा (Umran Malik) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र उमरानला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दौऱ्याचा भाग नसल्याने दीपक चहर, शार्दूल ठाकूर यांच्यासह मोहम्मद सिराज यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या सामन्यासाठी असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ (Team India Predicted Playing XI)

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माशिखर धवनविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App