Join us

IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

गोलंदाजीत अर्शदीप सिंगसह वरुण चक्रवर्तीचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:23 IST

Open in App

Australia vs India, 3rd T20I : वॉशिंग्टन सुंदरनं बॅटिंगमध्ये दाखवलेला क्लास शो आणि जितेश शर्मानं त्याला दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघानं होबार्टच्या मैदानात विक्रमी विजयाची नोंद केली आहे. टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टिम डेविड ७४ (३८) आणि मार्कस स्टॉयनिस ६४ (३९)  यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८६ झाला करत टीम इंडियासमोर १८७ धावांचे टार्गेट सेट केले होते. होबार्टच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वॉशिंग्टनचं अर्धशतक हुकले, पण...

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. शुबमन गिल १२ चेंडूत १५ धावा करून परतल्यावर अभिषेक शर्मानं १६ चेंडूत २५ धावा करत मैदान सोडले. सूर्यकुमार यादवनं ११ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २४ धावा करत या सामन्यात मोठा धमाका करण्याचे संकेत दिले. पण तो स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर फसला. तिलक वर्मानं २६ चेंडूत २९ धावांची उपयुक्त खेळी केली. पण ही विकेट पडल्यावर टीम इंडिया क्षणिक अडचणीत सापडली होती. पण वॉशिंग्टन सुंदरनं संधीच सोनं करत २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार मारत फलंदाजीतील खास नजराणा पेश केला. त्याने केलेल्या नाबाद ४९ धावांच्या खेळीशिवाय संजू सॅमसनच्या जागी संधी मिळालेल्या जितेश शर्मानं १३ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून विजयी धाव आली. भारतीय संघाने अर्धशतकाशिवाय दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या यशस्वीरित्या पार केली आहे.

 अर्धशतकाशिवाय सर्वाधिक यशस्वी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड (T20I)

  • १९७    इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिस्टल    २०२५ (जोस बटलर – ४७)
  • १८७    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हॉबार्ट    २०२५ (वॉशिंग्टन सुंदर – ४९*) 
  • १७९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका,  केपटाउन    २०१६ (स्टीव्ह स्मिथ -४४)

IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

गोलंदाजीत अर्शदीप सिंगसह वरुण चक्रवर्तीचा जलवा

पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघासमोर अर्शदीपनं सिंग इज किंग शो दाखवला. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. जॉस इंग्लिसला त्याने १ धावेवर तंबूत धाडले.  या दोघांशिवाय अर्धशतकवीर स्टॉयनिसची महत्त्वपूर्ण विकेटही अर्शदीप सिंगनेच घेतली. वरुण चक्रवर्तीनं मिचेल मार्श आणि मिचेल ओवेनच्या रुपात दोन विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय शिवम दुबेनं स्फोटक फलंदाजी करणाऱ्या टिम डेविडला तिलक वर्माकरवी झेलबाद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : India equals series with record win: Sundar shines in batting!

Web Summary : Washington Sundar's class batting and Jitesh Sharma's support led India to a record win in Hobart. Chasing 187, India leveled the series 1-1 after Australia set the target with David and Stoinis's half-centuries.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावॉशिंग्टन सुंदरसूर्यकुमार यादव