India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात भारतीय फलंदाज मोठ्या मैदानाचा अंदाज बांधण्यात चुकले. लोकेश राहुल ( KL Rahul) व रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहली, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी होती, परंतु ते अपयशी ठरले. तिघेही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) फॉर्म कायम राखताना अर्धशतक झळकावले आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर लोकेशने उत्तुंग फटके खेचले. त्यापैकी ३ प्रयत्न थेट स्टेडियममध्ये पोहोचले. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. रोहित नॉन स्ट्रायकरला उभा राहून लोकेशची फटकेबाजी पाहत होता. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानांवर षटकार मारणे सोपे नक्कीच नाही. अशाच एका प्रयत्नात लोकेश झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लोकेशने मारलेला फटका अॅश्टन अॅगरने टिपला. लोकेश ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला. त्यानंतर अॅगरच्या गोलंदाजीवर रोहितने ( १५) स्वीप शॉट खेचला अन् मॅक्सवेलने सीमारेषेवर झेल टिपला.
मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरवर विराट कोहली १९ धावांवर Fine Lageला झेलबाद झाला. पुढच्याच षटकात केन रिचर्डसनच्या शॉर्ट चेंडूवर हार्दिक ( २) झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने फटक्यांमध्ये वैविधता ठेऊन धावफलक हतला ठेवला, पंरतु तोही ( २० धावा, १४ चेंडू) रिचर्डसनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर मॅक्सवेलकरवी झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. सूर्यकुमार यादवने चांगली फटकेबाजी केली. त्याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या.
सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन्...
१९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिचेल स्टार्कने वेगवान बाऊन्सर टाकला. पूल शॉट मारण्यासाठी सूर्यकुमार सज्जच होता, परंतु त्याचे टायमिंग चुकले अन् चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला.. स्टार्क लगेच त्याच्याजवळ धावत गेला. नशीबाने तो चेंडू सूर्याच्या हेल्मेदच्या दर्शनीभागावर आदळला. डॉक्टरनेही मैदानावर धाव घेत लगेच सुर्याला तपासले. तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री पटताच तेही माघारी परतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"