Virat Kohli Cryptic Post Ahead Of India vs Australia ODI : क्रिकेटच्या मैदानातील किंग विराट कोहली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची 'बरसात' करण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली फक्त एकदिवसीय सामन्यातच खेळताना दिसणार आहे. कॅमबॅकच्या चर्चेसोबत त्याच्या आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील भविष्यासंदर्भात चर्चा रंगत असताना विराट कोहलीच्या एका खास पोस्टनं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीची पोस्ट चर्चेत
विराट कोहलीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. पण तो फारच कमी वेळा काही पोस्ट शेअर करताना दिसते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेआधी किंग कोहलीनं अधिकृत एक्स अकाउंटवरुन अपयश आणि पराभव यावर भाष्य करणारी पोस्ट स्टार क्रिकेटरनं शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसते. कोहलीनं लिहिलंय की, ज्यावेळी तुम्ही हार मानता, तोच तुमच्या अपयशाचा क्षण असतो. या आशयातील मोजक्या शब्दांत कोहलीनं प्रेरणादायी संदेश दिल्याचे दिसते.
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
हा प्रेरणादायी विचार घेऊनच तो वनडे कारकिर्द पुढे नेणार?
कोहलीच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? असा प्रश्नही काही चाहत्यांना पडले आहे. त्याला या पोस्टमधून नेमकं काय सुचित करायचं ते त्यालाच माहिती. पण सरळ सरळ अर्थ काढला तर त्याची ही पोस्ट प्रेरणादायी आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेनं बघत जिंकण्यासाठी मैदानात उतरायचे या अर्थानेही घेता येईल. जिथं तुम्ही हार मानता तिथंच तुम्ही अपयशी ठरता, हे सांगत कोहलीनं हार न मानता लढण्याचा इरादा ठेवा, असा एक संदेशच दिला आहे. टी-२० आणि कसोटीतून थांबण्याचा निर्णय घेतल्यावर वनडेत सर्वोत्तम देण्यासाठी कदाचित तो हा फंडा वापरून आपली कारकिर्द बहरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे दिसून येते.
कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी
विराट कोहलीनं आतापर्यंत ३०२ एकदिवसीय सामने खेळले असून २९० डावात त्याच्या खात्यात १४ हजार १८१ धावा जमा आहेत. ५७.८८ च्या सरासरीसह ९३ पेक्षा अधिकच्या स्ट्राइकरनं या धावा करताना त्याच्या भात्यातून ५१ शतके आणि ७४ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. १८३ ही वनडेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या वर्षात चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत तो शेवटचा वनडे सामना खेळला होता. या वर्षात ७ सामन्यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकासह २७५ धावा केल्या होत्या.