भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना झाला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कांगारूंनी दिलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियानं फायनल गाठली. भारतीय संघाच्या विजयात कोहलीनं मोठा वाटा उचलला. या सामन्यात त्याला आणखी एका शतकाची संधी होती. पण तो डाव काही साध्य झाला नाही. पण त्याची ८४ धावांची खेळी शतकापेक्षा काही कमी नव्हती. कारण त्याच्या या खेळीनं आयसीसी ट्रॉफीआड येणाऱ्या कांगारुंची टीम इंडियान शिकार केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१४ वर्षांनी भारतीयसंघानं ICC नॉकआउटमध्ये पराभूत करून दाखवलंय. भारतीय संघाच्या विजयानंतर किंग कोहलीच्या सेलिब्रेशनचा अंदाज बघण्याजोगा होता. सहकाऱ्यांच्या गर्दीतून बाजूला होत त्याने स्टँडमध्ये असलेल्या अनुष्कासोबत खास अंदाजात विजयाचा आनंद साजरा केला.
कोहलीचा अंदाज बघून अनुष्काही लाजली
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. टीम इंडियाच्या ताफ्यातील खेळाडूंनी एकमेकांची गळाभेट घेत विजयाचे सेलिब्रेशन केले. विराट कोहलीनं सर्वात आधी कॅप्टन रोहित शर्माला जादूची झप्पी दिल्याचा सीनही दिसला. पण 'विराट' आनंद साजरा करताना तो अनुष्काला नाही विसरला. ड्रेसिंग रुममधून बाहेर आल्यावर त्याने स्टेडियम स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहत खास अंदाजात सेलिब्रेशन केले. अनुष्का त्याचा अंदाज बघून लाजली अन् मग तिनेही त्याच्या आनंदात सहभागी असल्याचा इशारा केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हार जीत काही असो ती नेहमी सोबत असते अन् ते नेहमीच दिसते
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात कमालीचे बॉन्डिंग सातत्याने पाहायला मिळाले आहे. लग्नाआधी रंगलेली प्रेम कहाणी असो किंवा आता दोन मुलांचे आई-बाबा झाल्यावर दोघांनी एकमेकांवरील जपलेले प्रेम असो. ते अगदी चीरतरुण असेच आहे. विरुष्का जोडी आपल्या या अंदाजाने कपल गोलही सेट करताना दिसते. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघानं फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा दणका दिला होता. त्यावेळीही अनुष्का-विराटला धीर देताना दिसली होती. आज ती त्याच्यासोबत आनंदी क्षणाचा अनुभव घेताना दिसली. तो काळ गेला वेळ बदलली पण दोघांच्यातील प्रेम जसच्या तसं आहे, हेच या दोघांच्या फ्रेममधून दिसून आले.