Join us

IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम

Ind vs Aus Test : पर्थ कसोटीतील निकालाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत रंगत निर्माण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:15 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीला मेलबर्न कसोटीत विक्रमाची संधीएका खेळीने तेंडुलकर, गावस्कर आणि द्रविड यांच्या विक्रमाशी बरोबरीची संधी

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः पर्थ कसोटीतील निकालाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत रंगत निर्माण केली आहे. यजमान ऑस्ट्रेलियान पर्थवर विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे बुधवारपासून मेलबर्नवर होणाऱ्या 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पिछाडीवरून मुसंडी मारणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वकौशल्याचा कस या मालिकेत लागणार आहे. पण, या सामन्यात कोहलीला एक विक्रमही खुणावत आहे. या सामन्यात त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

भारतीय संघाला परदेश दौऱ्यात पराभव पत्करावा लागला असला तरी कर्णधार कोहलीसाठी 2018 हे वर्ष वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टीने अविश्वसनीय राहिले आहे. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांत 286 धावा केल्या आणि त्यात शतकाचा समावेश होता. त्या दौऱ्यात वन डे मालिकेत त्याने तीन शतकं झळकावली. इंग्लंड दौऱ्यातही कसोटी मालिकेत त्याने विक्रमी 593 धावा करताना दोन खणखणीत शतकं झळकावली. मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने वन डेत सलग दोन शतकं ठोकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याने दुसऱ्या कसोटीत 123 धावांची खेळी करत कसोटीतील 25वे शतक पूर्ण केले. 2018 या वर्षात त्याने एकूण 11 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली. त्याक पाच कसोटी आणि 5 वन डे शतकांचा समावेश होता.

वर्षाच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोहलीने आणखी एक शतक झळकावले तर तो तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. तेंडुलकरने 1998 या वर्षांत एकूण 12 शतकं झळकावली आहेत आणि त्याचा हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. याशिवाय कोहलीचे शतक हे लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी करणारे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ शतक करणारा कोहली हा गावस्कर यांच्यनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. याही विक्रमात तेंडुलकर 11 शतकांसह आघाडीवर आहे.

कोहलीला आणखी एक विक्रम खुणावत आहे. कॅलेंडर वर्षात परदेशात सर्वाधिक धावा करण्याचा राहुल द्रविड याचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला 82 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 1056 धावा आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसचिन तेंडुलकरराहूल द्रविडसुनील गावसकर