Join us

IND vs AUS: BCCIचा मोठा निर्णय! दुसऱ्या कसोटीच्या स्क्वॉडमधून जयदेव उनाडकटला काढलं बाहेर

ind vs aus, 2nd test: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:22 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 17 तारखेपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या आधी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला असून जयदेव उनाडकटला दुसऱ्या कसोटीतील स्क्वॉडमधून बाहेर केले आहे.  बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. खरं तर रणजी ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळता यावा यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जयदेव उनाडकट आता सौराष्ट्र संघात सामील होईल. 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध सौराष्ट्र असा अंतिम सामना होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव. 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघरणजी करंडक
Open in App