Join us

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

IND vs AUS T20 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवकडे इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:33 IST

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, विशेषतः आशिया चषक २०२५ मध्ये तो अपेक्षेप्रमाणे चमकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सूर्यकुमारला माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांनाही मागे टाकून एक महत्त्वपूर्ण विक्रम करण्याची संधी आहे.

रोहित शर्मा टी२० मधून निवृत्त झाल्यानंतर, सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत, सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. सध्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियात ९ षटकार मारले आहेत. जर त्याने या मालिकेत आणखी १२ षटकार मारले, तर तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरेल आणि विराट कोहलीला मागे टाकेल.

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय:

खेळाडूचे नावषटकार
विराट कोहली२०
हार्दिक पंड्या१२
केएल राहुल११
रोहित शर्मा१०
शिखर धवन
सूर्यकुमार यादव

सूर्यकुमारची ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंतची कामगिरी

सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कामगिरी खूपच प्रभावी राहिली, त्याने सहा सामन्यांमध्ये ५९.७५ च्या सरासरीने २३९ धावा केल्या. या काळात सूर्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत, ज्यात त्याचा सर्वोच्च धावसंख्या ६८ आहे. त्याचा स्ट्राइक रेट १९० च्या आसपास आहे. आपल्या जबरदस्त स्ट्राइक रेट आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 'स्काय' म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव, आगामी मालिकेत आपला फॉर्म परत मिळवून भारताला विजय मिळवून देण्यास उत्सुक असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav eyes record against Australia, surpassing Kohli and Rohit?

Web Summary : Suryakumar Yadav captains India in the T20 series against Australia. He aims to surpass Virat Kohli's record for most sixes in Australia. Yadav needs 12 sixes to achieve this milestone, building on his impressive past performance.
टॅग्स :सूर्यकुमार यादवरोहित शर्माविराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया