Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : सलामीला नव्हे, रोहितला 'या' क्रमांकावर बॅटिंग करू दे; विराटला 'दादा'चा सल्ला

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:46 IST

Open in App
ठळक मुद्देभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवाततीन ट्वेंटी, चार कसोटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिकाकसोटी विजयासाठी गांगुलीचा कानमंत्र

नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कांगारूंना त्यांच्याच भूमीवर नमवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघासाठी हे अशक्य नाही. तरीही त्यांना कमी न लेखण्याचा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. त्याशिवाय गांगुलीने कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीच्या क्रमावारी ठरवण्यासाठी विशेष सूचना केली आहे. 

भारतीय कसोटी संघाची रचना पाहता मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी दोघ सलामीला येतील, त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे हे अव्वल पाच फलंदाजांच्या जागा पूर्ण करतील. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत संघात असेल आणि हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे रोहित सहाव्या स्थानी फिट बसेल. रोहितला सलामीला न खेळवता सहाव्या क्रमावर खेळवण्याचा सल्ला दादाने दिला.

गांगुली म्हणाला,''रोहितबाबत मला विचाराल, तर त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवणे फायद्याचे ठरेल. त्यासाठी अंतिम अकरामध्ये तीन जलदगती गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज अशी रचना ठेवावी लागेल. त्यामागे सोपं गणित आहे. रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य होणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर त्याच्यासारख्या फलंदाजाची आवश्यकता आहे.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसौरभ गांगुलीरोहित शर्मा