Join us

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला

India vs Australia Test , Pat Cummins : ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाला परतणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 09:16 IST

Open in App

India vs Australia Test , Pat Cummins : ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. न्यूजकॉर्पच्या वृत्तानुसार, २९ वर्षीय कमिन्स इंदूरमधील तिसर्‍या कसोटीपूर्वी काही दिवसांसाठी सिडनीला रवाना झाला आहे. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीपूर्वी तो भारतात परतण्याची शक्यता आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवार १ मार्चपासून सुरू होत आहे. भारताने रविवारी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचा  सहा गडी राखून पराभव करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम

राखली. कमिन्सने मालिकेत आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. 

BGT ट्रॉफी राखली, कसोटी वर्ल्ड कप फायनलचं काय? भारतासमोरील आव्हान अजून संपलेलं नाही, पाहा गणित

भारताकडून सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आता मोठा धक्का बसला आहे. त्यांनी यापूर्वीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे दोन सामने गमावले आहेत आणि आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला आहे. कमिन्स कुटुंबातील आजारपणामुळे तो आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात, ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर मिचेल स्वीपसन त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्याच्याजागी क्वीन्सलँडचा सहकारी मॅथ्यू कुहेनेमनने पदार्पण केले होते.  

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारताने रविवारी ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात करत मालिकेत २-०अशी आघाडी घेतली. कमिन्स दिल्लीत ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून खेळला. सामन्याच्या चौथ्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेले ११५ धावांचे लक्ष्य भारताने तिसऱ्या दिवशी सहज गाठले. कमिन्स तिसऱ्या कसोटीला मुकला तर स्टीव्ह स्मिथ इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो. 

  • तिसरी कसोटी इंदूर : १ मार्चपासून सुरू होईल
  • चौथी कसोटी अहमदाबाद – ९ ते १३ मार्च.
  • पराभवानंतर कमिन्सने पत्रकारांना सांगितले की,निराश झालो आहे. आम्ही सामन्यावर पकड घेतली होती, परंतु ती निसटली.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया
Open in App