Join us  

IND vs AUS : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे Official वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण!

India Tour of Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, ती ऑस्ट्रेलिया दौऱ्याची...

By स्वदेश घाणेकर | Published: October 28, 2020 4:16 PM

Open in App

India Tour of Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, ती ऑस्ट्रेलिया दौऱ्याची... क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) बुधवारी या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (  Border-Gavaskar Trophy) ची चुरस १७ डिसेंबरला अॅडलेड ओव्हल मैदानावरून डे नाईट कसोटीनं होईल. त्यानंतर मेलबर्न, सिडनी आणि गॅबा येथे उर्वरित कसोटी सामने खेळवण्यात येतील. दोन्ही संघ डे नाईट कसोटीत अपराजित आहेत. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यावर, तर भारतानं बांगलादेशवर विजय मिळवला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल आणि १२  नोव्हेंबरला भारतीय संघ सिडनीत दाखल होईल. त्यानंतर भारतीय खेळाडू १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहतील. कसोटी मालिकेपूर्वी भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत सामना खेळवला जाईल आणि भारतीय संघ सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ११ते १३ डिसेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध डे नाईट सराव सामना खेळेल.   वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

या दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ

ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

या दौऱ्यासाठी चार अतिरिक्त गोलंदाज - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी नटराजन

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाभारतबीसीसीआय