Join us

IND VS AUS: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर

फलंदाजी करताना जडेजाच्या हातावर आदळला होता चेंडू, अंगठ्याला झाली होती दुखापत

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 19:34 IST

Open in App
ठळक मुद्देसहा आठवड्यांसाठी जडेजा खेळापासून दूरजडेजाची कमतरता जाणवेल, पुजाराची प्रतिक्रिया

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. परंतु यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे. सिडनीत खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्या जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाला आहे.सिडनी कसोटी सामन्यादरम्यान जाडेजाच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स काढण्यात आले. त्यामध्ये त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आणि डिसलोकेट झाल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, जडेजा हा किमान सहा आठवडे खेळू शकणार नाही. तसंच यासंदर्भात तज्ज्ञांचं मतत जाणून घेतलं जाणार आहे. त्यानंतरच त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा नाही हे पाहिलं जाणार असल्याचं सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. "त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आणि डिसलोकेशन झालं आहे. तो जवळपास ६ आठवडे खेळापासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा नाही यासंदर्भात तज्ज्ञांचंदेखील मत जाणून घेतलं जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासल्यानंतरच त्याच्या पुढील इंग्लंडसोबतच्या मालिकेबाबत निर्णय घेतला जाईल," असंही सूत्रांनी सांगितलं. फलंदाजी करताना मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चेंडू त्याच्या हातावर आदळल्यामुळे जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करतानाही त्याला त्रास झाला होता. त्यांतर जडेजाला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर तपासणीदरम्यान त्याला फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे पंतला कोपरावर लागलेली दुखापती इतकी गंभीर नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसू शकतो.जडेजा बाहेर जाणं मोठा धक्काजडेचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर जाणं हे भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात आहे. जडेजानं या सामन्यांदरम्या उत्तम कामगिरी केली होती. मेलबर्न येथील कसोटी सामन्यात जडेजानं अर्धशतक ठोकलं होतं. तस सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं चार गडी बाद केले होते. याव्यतिरिक्त त्यानं उत्तम क्षेत्ररक्षणही केलं होतं. दरम्या, चेतेश्वर पुजारानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यांतर यावर प्रतिक्रिया देत जडेजाची कमतरता भारतीय संघाला जाणवणार असल्याचं म्हटलं.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरवींद्र जडेजाचेतेश्वर पुजाराआॅस्ट्रेलियाबीसीसीआय