Join us

IND vs AUS 5th T20I Live Streaming : विजयी हॅटट्रिकसह टीम इंडिया वनडेतील पराभवाचा वचपा काढणार?

दमदार कमबॅकसह मालिका विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे टीम इंडिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 22:47 IST

Open in App

India vs Australia 5th T20I Live Streaming : भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरुवात खराब झाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा विराट कोहलीचा जलवा दिसला. पण ही मालिका भारतीय संघाने २-१ अशी गमावली. टी-२० मालिकेतील पहिल्या सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर या मालिकेतही दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण मग सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं पुन्हा एकदा कमबॅकची नवी स्क्रीप्ट लिहिली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दमदार कमबॅकसह मालिका विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे टीम इंडिया 

 तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारतीय संघ आता मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 'करेक्ट कार्यक्रम' करून टीम इंडिया वनडेतील पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कधी रंगणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील अखेरचा सामना? Live स्ट्रीमिंगच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद कसा घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती

Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!

कधी अन् कुठं रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना शनिवारी, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेन येथील द गाबाच्या स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. त्याआधी १ वाजून १५ मिनिटांनी दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. यजमान ऑस्ट्रेलिया संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीचा डाव साधण्यासाठी जोर लावेल. दुसरीकडे भारतीय संघ सलग तिसऱ्या विजयासह मालिका विजयाचा डाव साधत वनडेतील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

IND vs AUS 5th T20I  Live Streaming चा आनंद कसा घेता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील सामन्याच्या प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामना देखील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय जियोहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातूनही क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेविड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अ‍ॅडम झाम्पा, बेन  बेन द्वारशुइस.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs Australia T20I: Can India clinch series after ODI loss?

Web Summary : After losing the ODI series, India aims for a T20I series victory against Australia. With two consecutive wins, India seeks to continue its winning streak and avenge the ODI defeat in the final T20I match in Brisbane.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवग्लेन मॅक्सवेल