चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली सेमीफायनल लढत दुबईच्या मैदानात रंगली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ या सामन्यात धावांचा पाठलाग करणार आहे. भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागचं कारण
टीम इंडियानं मुंबईकर दिग्गज क्रिकेटरला वाहिली श्रद्धांजली
सोमवारी भारतीय क्रिकेटर आणि मुंबईचे महान फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये या दिग्गजाने ६०० हून अधिक विकेट घेत भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. या दिग्गजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.